आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केलाय – एकनाथ शिंदे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०६ ऑक्टोबर २०२२


दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.उद्धव ठाकरेंच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गद्दार आणि खोके यावरूनही त्यांनी विरोधकांना सुनावलं. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही केली, आम्ही केलेली गद्दारी नाही तर गदर आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचा शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? जनतेला समजलं आहे. म्हणून जनता आमच्याबरोबर आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *