तब्बल 120 किलो सोन्याची स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी

अतुलसिंह परदेशी
मुख्य संपादक
०६ फेब्रुवारी २०२२

हैदराबाद


120 kg of gold Statue of Equality
फक्त 120 किलो सोन्याची स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी

1 हजार कोटींचा खर्च आणि 120 किलो सोन्यापासून निर्मित स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी

भारतातील महान संतांपैकी एक असलेल्या रामानुजाचार्य यांचे सहस्राब्दी वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांच्या स्मरणार्थ हैदराबादमधील श्रीरामनगर जीवा आश्रमाच्या जवळ 216 फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.याला ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ असं नाव देण्यात आलं आहे.तब्बल 120 किलो सोने वापरून ही मुर्ती बनविण्यात आली असून यासाठीचा एकूण खर्च जवळपास 1 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

रामानुजाचार्य यांची आणखी एक मूर्ती 120 किलो सोन्यापासून तयार केली असून ती मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवली जाणार आहे.रामानुजाचार्य यांची सर्वात मोठी मूर्ती चीनमध्ये तयार करण्यात आली असून त्याचा खर्च 400 कोटी रुपये इतका आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याची नोंद झाली आहे.या मंदिरात जवळपास 25 कोटी रुपये खर्चून संगीतमय कारंजे लावण्यात आले आहेत. यातून स्वामी रामानुजाचार्य यांची गाथा ऐकवण्यात येते.

Cost of Rs.1000 crore and Statue of Equality made from 120 kg of gold
1 हजार कोटींचा खर्च आणि 120 किलो सोन्यापासून निर्मित स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *