निगडी लोकमान्य टिळक चौक ते दुर्गा नगर चौका पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत होणार विकसित…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ११ जून २०२१
चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 यमुनानगर भागातील लोकमान्य टिळक चौक ते दुर्गा नगर पर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट अंतर्गत विकसित होणार आज त्याचे भूमिपूजन करण्यात आले या भूमिपूजनासाठी उपस्थित महापौर माई ढोरे , विद्यमान आमदार महेश दादा लांडगे , विश्व हिंदू परिषद अध्यक्ष पि ची, शरद इनामदार सर, ज्येष्ठ नागरिक अण्णा अडी, अप्पा कुलकर्णी, विकासजी देशपांडे, भगवानजी श्राद्धे काका, बापुजी घोलप , गोरखजी कोलते, ए पी कुलकर्णी, शेखर आसरकर, गिरीजी देशमुख, आदित्य कुलकर्णी, प्रथमेश आंबेडकर, शिरीष जी जेधे , अनिलजी वाणी, प्रशांत बाराते, सारिकाताई चव्हाण, विमलताई काळभोर, निलमताई गोलार, मकवाना ताई,
गेल्या अनेक वर्षापासून या कामाच्या प्रतीक्षेत आम्ही होतो.

प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी वर्ग, सकाळी सकाळी मॉर्निंग साठी जाणारा वर्ग यासाठी व्यवस्थितपणे रस्त्याने चालता यावे, सायकलिंग व्यवस्थित करता यावी, यासाठी या कामासाठी आम्ही सर्व आग्रही होतो

📍 अर्बन स्ट्रीट या कामामुळे निगडी कडून येणारी व त्रिवेणी नगर मार्गे भोसरी कडे जाणारी वाहतुक सुरळीत होण्यास मदत होईल

📍 या कामामुळे सायकल ट्रॅक आणि पदचारी द्वारे जाणारे नागरिक यांना सुरक्षितपणे मार्गक्रम करता येईल

📍 लोकमान्य टिळक चौक ते दुर्गा नगर चौक वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल

📍 व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल

🔰सदर काम निखिल कंट्रक्शन यांना देण्यात आलेले आहे ,

🔰मुख्य रस्त्याची लांबी : 1530 मी व मुख्य रस्त्याची रुंदी : 24.00 मी, इतकी

🔰सदर कामाची निविदा : 16 कोटी 54 लाख

🔰कामाचा कालावधी : 18 महिने

या महत्वकांशी कामाची सुरुवात आजपासून करण्यात येणार आहे

नगरसेवकाच्या प्रतिक्रिया –

📍कमलताई घोलप – वाहतुक सुरळीत होईल व नागरीकांना जाण्यास मार्ग सुरळीत होईल

📍उत्तम केदंळे – जेष्ठ नागरीक व नागरिक व विद्यार्थी यांच्या साठी पदचारी मार्ग चांगला होईल

📍सुमनताई पवळे – या कामामुळे निगडी व यमुनानगर भागातील शुशोभिकरण होण्यास मदत होईल

📍सचिन चिखले – या कामामुळे निगडी व यमुनानगर भागातील जेष्ठ नागरीक नागरीक व विद्यार्थी व सायकल चालक यांचा मार्ग सुरळीत होईल व प्रभागातील वैभव वाढेल

सदर काम चारही नगरसेवक यांच्या प्रयत्नातून झाल्याचे नगरसेवक सचिन चिखले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *