दुहेरी जन्मठेपेच्या गुन्ह्यात पॅरोलवर फरार असलेल्या पिस्टल विक्री करणाऱ्या ऑनर किलर आरोपीस भोसरी पोलीसांकडुन अटक

पोलीस आयुक्त  विनय कुमार चौबे साो. यांचे आदेशानुसार पिंपरी चिंचवड आयुक्तालयात अवैध्य शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मोहीम चालु असताना भोसरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला माहिती मिळाली की, काही इसम हे शस्त्र विक्री करण्यासाठी भोसरी परिसरात येणार आहे. सदर ठिकाणी भोसरी पोलीसांनी सापळा लावुन इसम नामे १) दिलीप प्रेमनारायण तिवारी, वय ४२ वर्षे, रा. मराठा चौक, रोशन मस्जित मागे, गल्ली नं.७, अब्दुल मल्लिक यांची रूम, इचलकरंजी, ता. हतकणंगले, जि. कोल्हापुर मुळ रा. ग्राम पोस्ट बिजुरी, तहसिल बेंदकी, जि. फतेहपुर राज्य उत्तर प्रदेश , चंदनकुमार उर्फ बैजुराय चंदेशवर राय, वय १९ वर्षे, रा. खोतवाडी पार्वती इंडस्ट्रीज समोर, इचलकरंजी, ता. हातकंगले, जि. कोल्हापुर मुळ रा. जहांगिरपुरसाम पो. देसरी, मंडल महानार, जि. वैशाली राज्य बिहार, सुगनकुमार जवाहिर राय, वय १८ वर्षे, रा. खोतवाडी, पार्वती इंडस्ट्रीज समोर, इचलकरंजी, ता. हातकंगले, जि. कोल्हापुर मुळ रा. बिशणुपुर सैदअली, मंडल विदुपुर जि. वैशाली राज्य बिहार यांना ताब्यात घेतले असता त्यांचे ताब्यातुन ८२,०००/- रुपये किंमतीचे एक पिस्टल, दोन जिवंत काडतुसे व एक गावठी कट्टा मिळुन आल्याने त्याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील आरोपी नामे दिलीप प्रेमनारायण तिवारी हा याने ऑनर किलर संदर्भात वसई येथे त्याने ४ जनांची हत्या तसेच २ जनांचा खुन करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा लागली होती दरम्यान तो कोवीड काळात पॅरोलवर बाहेर आला परंतु जेलमध्ये परत गेलाच नसुन तो अवैध्य शस्त्र विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले असुन त्याबाबत अधिक तपास चालू आहे.

सदरची कामगिरी  पोलीस आयुक्त  विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त  डॉ. संजय शिंदे,  अप्पर पोलीस आयुक्त  वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ – १ विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग  विशाल हिरे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक  भास्कर ” जाधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक, कल्याण घाडगे, पोलीस उप-निरीक्षक मुकेश मोहारे, तसेच सहा. पोलीस फौजदार राकेश बोयणे, पोलीस अंमलदार सचिन गारडे, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, सागर जाधव, तुषार वराडे, आशिष गोपी, प्रतिभा मुळे, संतोष महाडीक, स्वामी नरवडे, भाग्यश्री जमदाडे, सुषमा पाटील यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *