खुनाच्या गुन्ह्यात एक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस आळेफाटा पोलिसांनी केली अटक

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
०५ फेब्रुवारी २०२२

आळे(ता. जुन्नर )


आळे(ता. जुन्नर )गावच्या हद्दीत सुमारे एक वर्षापूर्वी एका मजूराच्या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीस आळेफाटा पोलिसांनी अहमदनगर येथे ताब्यात घेऊन त्यास अटक केली असल्याची माहिती आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिली आहे.सुधीर चंपालाल जाधव ( वय ३८ वर्ष सध्या राहणार विळद ता जि अहमदनगर मुळगाव आरडगाव ता राहूरी जि अहमदनगर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की साधारणता एक वर्षापूर्वी आळे गावच्या हद्दीत आळेफाटा बसस्थानकाच्या मागील बाजूस मोहनसिंग ननहकसिंग ( वय ४० वर्ष सध्या राहणार आणे ता जुन्नर जि पुणे मुळगाव मुरमाथाना मेदीनीनगर सतबरवा पलामू झारखंड राज्य) याचे डोक्यात सिमेंट ब्लाॅक टाकून खून केला होता तेंव्हापासून आरोपी सुधीर चंपालाल जाधव हा फरार होता.

आळेफाटा पोलिसांनी त्याचा शोघ घेतला परंतु तो आढळून आला नाही त्यानंतर आळेफाटा पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुधीर जाधव हा नगर एम आय डी सी येथे रहात आहे याबाबत पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक डाॅ अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर पोलिस हवालदार विनोद गायकवाड भिमा लोंढे लहानू बांगर पोलिस अंलदार अमीत माळूंजे यांच्या पथकाने सुधीर चंपालाल जाधव यास अहमदनगर येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले व त्यास अटक केली पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *