विणाकारण डायल ११२ वर फोन करणे पडलं महागात चास येथील युवकांवर गुन्हा दाखल

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०६ फेब्रुवारी २०२२

घोडेगाव


Youth charged for dialling 112 as a prank after investigation.
विणाकारण डायल ११२ वर फोन करणे पडलं महागात चास येथील युवकांवर गुन्हा दाखल

घोडेगाव पोलिस स्टेशच्या हद्दित असलेल्या तोडकरमळा ,चास ता. आंबेगाव येथे दारूच्या नशेत कोणतीही आपत्कालीन घटना घडली नसताना विनाकारण फोन करून पोलिसांच्या कामकाजाचा वेळ वाया घालवला त्यामुळे अविनाश बबन तोडकर या युवकावर गुन्हा रजिस्टर नंबर २१/ २०२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती घोडेगाव पोलिस स्टेशनने दिली.

पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने गुन्हा,अपघात महिलांवर होणारे अत्याचार, घरगुती हिंसाचार,आग लागणे अशा व इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिक व महिलांना तत्काळ मदत मिळावी या हेतूने डायल ११२ ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे.सदर संकल्पने अंतर्गत नागरिक व महिलांना पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून तत्काळ मदत होत असल्याने त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

काही समाजकंटक लोक सदर यंत्रणेचा दुरुउपयोग करण्याच्या तसेच पोलिस दलाला त्रास देण्याच्या उद्देशाने विनाकारण नशापाणी करून डायल ११२ या फोन करून पोलीस दलाचा कामाचा वेळ व्यर्थ घालवीत आहेत अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी घडलेले आहेत.

घोडेगाव पोलिस स्टेशन हद्दितील नागरिकांना मदतीची आवश्यकता असल्यास डायल ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा घोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आपणास आवश्यक ती मदत तात्काळ केली जाईल परंतु पोलिस दलाला त्रास देण्याच्या उद्देशाने विनाकारण नशापाणी करून डायल ११२ या यंत्रणेवर फोन करून पोलिस दलाचा कामाचा वेळ व्यर्थ घालवल्यास संबंधित इसमावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आवाहन घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *