फेट्यांचा खर्च टाळून लग्नात कलमी आंब्याच्या रोपांचे वाटप

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२१ जानेवारी २०२२

आळेफाटा


आळ्यात कुऱ्हाडे व औटी कुटुंबीयांचा पर्यावरण पूरक उपक्रम

आळे (ता.जुन्नर) येथील कुऱ्हाडे परिवार व राजुरीच्या औटी परिवाराने विवाह सोहळ्यात फेट्याच्या खर्चाला फाटा देवून आलेल्या पाहुण्यांना प्रत्येकी एक अंब्याचे रोप भेट देवून स्वागत केले. ग्रामिण भागात वाढत्या कोरोना च्या धर्तीवर मानापानाच्या फेट्यांच्या खर्चात कपात करून आंबा रोपे भेट देवून पर्यावरण पुरक संदेश देण्याचा अभिनव उपक्रम या विवाहप्रसंगी केला आहे.


वधू पिता दत्तात्रय कुऱ्हाडे, आळे गावचे उपसरपंच अॅड विजय कुऱ्हाडे, वडगाव आनंद चे माजी सरपंच प्रकाश गडगे, वर पिता किसनराव औटी यांच्या संकल्पनेतून लग्नात आलेल्या पाहुण्यांना कलमी आंबा रोपांचे वाटप करण्याचे ठरले. एक स्तुत्य उपक्रम राबविल्याने हा रोपे वाटपाचा लग्नात आकर्षणाचा विषय ठरला आहे. परिसरात या विषयी कौतुक होत आहे. वधूवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *