युवक काँग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात “विश्वासघात आंदोलन”

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि.१७ फेब्रुवारी २०२१
सात्तत्याने होत असलेल्या पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅस च्या दरवाढी विरोधात व केंद्र सरकारच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने चिंचवड चौकात विश्वासघात आंदोलन करण्यात आले.
या वेळी केंद्रातील भाजपा च्या मोदी सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली. सबके साथ विश्वासघात ! अब की बार बूरे फसे यार ! झुठे वादे ! झुठी सरकार ! भाजपा सरकार मुर्दाबाद ! अशा घोषणा देण्यात आल्या.
पेट्रोल च्या किमती ने शंभरी गाठल्याने या वेळी उपहासात्मक दर-शतक साजरे करण्यात आले या साठी काही कार्यकर्त्यांनी डोक्यावर क्रिकेट हेल्मेट व हातात बॅट घेऊन विडंबनात्मक सेंचुरी सेलिब्रेशन करत केंद्र सरकारचा निषेध केला.

या बाबत माहीती देताना युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले,
“देशातील नागरिकांपुढे आज जीवनावश्यक असलेल्या इंधन दरवाढी चे भस्मासुरी संकट येऊन ठेपले आहे. देशात प्रथमच पेट्रोल किमतीच्या इतिहासात पेट्रोल ची विक्रमीविक्री १०० रूपयां पर्यंत प्रतिलिटर झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एका बॅरल कच्च्या तेलाची किंमत ६० डाॅलर च्या आसपास आहे, काही वर्षांपूर्वी काँग्रेस च्या मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात हा दर १०० डाॅलर असतानाही भारतात पेट्रोल व डिझेलने प्रति लिटर रू.७० किंवा रू.८० ची मर्यादा ओलांडली नव्हती.
देशात तीन वर्षांपूर्वी जेव्हा जीएस टी कायदा अस्तित्वात आला तेंव्हा केंद्र सरकारने जाणीवपुर्वक पेट्रोल डिझेल आणि सर्व इंधनाना जीएसटी कक्षेच्या बाहेर ठेवले होते. खरेतर इंधने जीएसटी मध्ये आली तर निश्चित स्वस्त होऊ शकतात. इंधनाच्या मुळ किमती वरील कर कमी केले तर नागरिकांना दरकपातीने थोडा दिलासा मिळेल पण याउलट केंद्र सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पानतंर ‘कृषी अधिभार’ नावाचा एक नवा उपकर लागू केला आहे याचा थेट फटका नागरिकांवर बसत नसला तरी इंधन दर कमी होण्यात याचा अडथळा होत आहेच.
केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार महागाई रोखण्यात सपशेल अपयशी ठरले तर आहेच पण नागरिकांवर मोठीसंकटे निर्माण करणारे जनमारक सरकार ठरले आहे. या सरकारची नागरिकाप्रतीची विश्वासघाती वृत्ती समोर आली आहे व केवळ काही उद्योजक हिताचे काम करणारे हे सरकार बदलणे हेच काम अग्रक्रमाने केल्याशिवाय आता हि हवालदिल जनता शांत बसणे शक्य नाही.” असे बनसोडे म्हणाले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव अक्षय जैन, कौस्तुभ नवले, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, शिव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष युवराज दाखले, सामाजिक कार्यकर्ते आण्णा पंद्री,कष्टकरी कामगार परिषदेचे नेते प्रल्हाद कांबळे, बहुजन चळवळीतले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे, मीनाताई कांबळे शहर काँग्रेस चे पदाधिकारी संदेश नवले, आबा खराडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, युवक काँग्रेस चे शहर सरचिटणीस राहूल काळभोर, शंकर ढोरे, विरेंद्र गायकवाड, गणेश शितोळे, हर्षवर्धन पांढारकर, विशाल सरवदे, अनिल सोनकांबळे, मिंलिद बनसोडे, अलोक लाड, अर्णव कामठे, अमित जगदाळे, तेजस पाटील, प्रविण जाधव, तेजस पवार, आफताब खान, नईम शेख, जाकीर चौधरी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *