घोडेगाव येथे राष्ट्रीय युवादिन संपन्न
मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१४ जानेवरी २०२२
घोडेगाव
घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी. डी. काळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग,विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय छात्र सेना या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. अजितशेठ काळे व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर यांचे हस्ते प्रतिमा पुजन संपन्न झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ.इंद्रजित जाधव,एनसीसीचे प्रमुख प्रोफेसर डॉ.बाळासाहेब गव्हाळे, प्रा.सोमनाथ जगताप आणि एनसीसीचे कॅंडिडेट, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सेवक उपस्थित होते.