‘बूस्टर डोससाठी फोन आला, तर व्हा सतर्क’ – पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१५ जानेवरी २०२२

बेल्हे


सायबर हॅकरकडून फसवणुकीचा नवीन फंडा अवलंबविला जात आहे. फाेनवर काेराेना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याची अचूक तारीख सांगत त्यानंतर ओमायक्राॅन टाळण्यासाठी तिसऱ्या बूस्टर डोससाठी विनंती हॅकर करेल, ओटीपी पाठवल्यानंतर मोबाइल हॅक करत बँक खात्यातून रक्कम लांबवत फसवणूक हाेते. फसवणूक टाळण्यासाठी आळेफाटा पोलिस जनजागृती करत आहेत.

हॅकरकडून फसवणुकीचा नवीन फंडा

लसीकरणाच्या नावावर फसवणुकीच्या या नवीन प्रकारात हॅकर काॅल करत फाेनवरील व्यक्तीस त्याच्या लसीकरणाची अचूक तारीख सांगून बूस्टर डोससाठी विनंती करत डोस नोंदणीच्या नावावर ओटीपी पाठवला जातो. तो ओटीपी विचारतो. ओटीपी दिल्यानंतर संबंधिताचे बँक खाते हॅक करत रक्कम काढून घेताे. बूस्टर डोससाठी मोबाइलवर येणारे काॅल फसवे आहेत. तुम्हाला कोणी डोससाठी विनंती करत असेल अथवा ओटीपी पाठवला असेत तर त्याला प्रतिसाद देऊ नका. हा हॅकिंगचा नवीन फंडा आहे. आळेफाटा पोलिसांकडून अशाप्रकारचे फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *