रितेश कुमार यांनी स्विकारली पुणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे

१७ डिसेंबर २०२२

पुणे


नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची गृहविभागाने पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून पदभार स्विकारला.

गुप्ता यांची गृहविभागाने राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली. रितेश कुमार भारतीय पोलीस सेवेच्या १९९२ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. शहरातील गुंडगिरी, वाहतूक समस्या, सायबर गुन्ह्यांसह गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्याचे आव्हान पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्यासमोर आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *