पिंपळे निलख येथील शहीद अशोक कामटे उद्यानातील हत्ती शिल्पं हटवण्यासाठी आज आमरण उपोषण

१४ डिसेंबर २०२२


पिंपळे निलख येथिल शहिद अशोक कामटे उद्यानातील हत्ती शिल्पं बसवण्यात आला आहे.तो हत्ती शिल्पं लवकरात लवकर हटवण्यात यावा कारण की पिंपळे गुरव येथिल राजमाता जिजाऊ उद्यानास त्या नावाने ओळखले जात नाही परंतु डायनासोर गार्डन या नावाने ओळखले जाते.मग त्या उद्यानास राजमाता जिजाऊचे नाव देण्याचा हेतु साध्य झाला का हा प्रश्न पडतो ? की फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी राजमाता यांचे नाव दिले हा एक संशोधनाचा विषय आहे. याच प्रमाणे पिंपळे निलख येथिल शहिद अशोक कामटे उद्यानात देखिल असाच हत्ती शिल्पं बसवण्यात आला आहे. अजून हत्ती शिल्पाचे उद्धघाटन झाले नाही .हे हत्ती शिल्पं काढण्यासाठी ड प्रभाग येथिल तीन ते चार वेळा जनसंवाद सभेत हा प्रश्न उपस्थित केला आहे.परंतु त्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

शहिद अशोक कामटे यांचा मान ठेवायचा असेल तर ते हत्ती शिल्प त्या उद्यानातून काढण्यात आले नाही तर समाजातील नागरिक पिंपळे निलख येथिल उद्यानास कामटे यांच्या नावाने न ओळखता.हत्ती उद्यान या नावाने ओळखले जाईल आणि हा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही . उद्यानातील हत्ती शिल्प हटवण्यात आले नाही त्यामुळे मी शहिद अशोक कामटे उद्यान समोर आमरण उपोषणाला बसत आहे. या सर्व विषयांवर पोलीस प्रशासनाच्या विनंतीने महानगरपालिका प्रशासन व आमच्या प्रतिनिधीं मध्ये चर्चा झाली असता त्यामधूना महानगरपालिका प्रशासनाकडून याबाबत ठोस निर्णय न झाल्यामुळे आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत.

प्रमुख मागण्या –

1) शहिद अशोक कामटे उद्यानातील हत्ती लवकरात लवकर हटवण्यात यावा.
2) हत्ती शिल्पाच्या जागी शहीद व सैन्यांच्या स्मरणार्थ कोणतेही शिल्प लावावे
3) उद्यानातील पथदिव्यांची संख्या वाढवण्यात यावी.
4) सुरक्षा रक्षक यांची संख्या वाढवावी.