झोपडपट्टीवासीयांचा वस्तुनिष्ठ अहवाल दिल्ली बोर्डाला पाठवावा – मारुती भापकर

रोहित खर्गे
विभागीय संपादक
 १३ एप्रिल २०२२

चिंचवड


आनंदनगर,साईबाबानगर चिंचवड मधील हजारो झोपडपट्टी वाशियांना भारतीय रेल्वेने ‌न्यायालयाचा संदर्भ देऊन १५ दिवसात घरे खाली करण्याच्या नोटिसा वाटप करण्यात येत आहेत.त्यामुळे या परिसरातील जेष्ठ नागरिक,महिला, युवक,युवती या सगळ्यांमध्ये घबरहाट निर्माण झाली आहे. आज मंगळवार दि.१२ एप्रिल २०२२रोजी दुपारी १२.३०वाजता घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने मध्य रेल्वे अधिकारी गौतम मुसळे यांची रेल्वे मुख्यालयात पुणे स्टेशन येथे भेट घेतली. यामध्ये सर्वपक्षीय व सामाजिक राजकीय संघटनाच्या पदाधिकारयाचा समावेश होता.  मुसळे यांनी आम्हाला रेल्वे बोर्ड दिल्ली कडुन आदेश आहेत.रेल्वे विभागाला दर पंधरा दिवसांनी माहिती सादर करावी लागते त्यामुळे दिल्ली कडुन स्थगिती आदेश येत नाही तो पर्यंत हि कारवाई सुरुच राहणार असे मुसळे यांनी स्पष्ट केले.याला आक्षेप घेताना यावेळी मारुती भापकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देऊन यामध्ये सुरत ते जळगाव रेल्वे लाईन टाकताना अडथळा ठरणाऱ्या झोपडपट्टी बाबत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.हा निर्णय देताना वेगवेगळ्या राज्यांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनासाठी असणारय धोरणाचा विचार करून या बाबत पयांय काढावा असे हि न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.हा निर्णय दक्षिण रेल्वे साठी असताना आपले रेल्वे प्रशासन मध्ये रेल्वे विभागात त्याचा आधार घेऊन हि कारवाई आपले रेल्वे प्रशासन करत आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांन मध्ये घबरहाट निर्माण झाली आहे.

आनंदनगर, साईबाबानगर या झोपडपट्टया पन्नास -साठ वर्षांपासून या ठिकाणी वसलेल्या आहेत.या झोपडपट्टया घोषीत असुन या झोपडीधारकांकडे फोटोपास आहेत.मतदार यादीत या लोकांची नावे आहेत.अशा लोकांची पर्याय व्यवस्था पुनर्वसना शिवाय कारवाई करता येत नाही.अशी महाराष्ट्रातील प्रचिलित कायद्यात तरतूद असताना आपले रेल्वे प्रशासन हि अन्यायकारक कारवाई करत आहे.ऐवढेच नव्हे रेल्वे रेल्वेच्या जागा सोडुन खाजगी जागेवरील झोपडपट्टीना हि नोटीस दिली आहे.हि कारवाई झालीच तर आपल्या शहरात २५हजार झोपडपट्टीवाशिय विस्थापित होऊ शकतात अशा परिस्थितीत आपल्या शहरात भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते? ‌त्यामुळे या प्रकरणाचा वस्तू निष्ठ अहवाल दिल्ली बोर्डाला पाठवावा अशी हातझोडुन विनंती भापकर यांनी केली.यावर पन्नास वर्ष महापालिका प्रशासन झोपले होते का? त्यांनी पन्नास वर्षांत का पुनर्वसन केले नाही.या मुसळे यांच्या वाक्याला प्रसाद शेट्टी यांनी आक्षेप घेताना महापालिकेने पन्नास वर्षांत पुनर्वसन केले नाही हि त्यांची चुक झाली मात्र पन्नास वर्ष हे लोक राहतात त्यावेळी रेल्वे प्रशासन झोपले होते का? त्यामुळे महापालिका व रेल्वे प्रशासन दोघांची हि चुक झाल्याली आहे.यावर सकात्मक मागं काढावा अशी मागणी शेट्टी यांनी केली.

काळुराम पवार यांनी आमच्या विभागातील झोपडपट्टी विभागातील नागरिकांच्या भावना खुप त्रीव़ आहे ‌जर रेल्वे प्रशासन कारवाई करणार असेल आम्हाला त्रीव़ आंदोलन करावे लागेल असा इशारा पवार यांनी रेल्वेला दिला.मारुती अण्णा पंद़ी यांनी हि आमच्या लोकांच्या झोपा उडाल्या असुन लोक जेवण करत नाही,आजारी जेष्ठ लोक टेंशन मधे आहे.त्याचा या कारवाईत रेल्वे बळी घेणार का? यावेळी शमीम पठाण नेताजी शिंदे देवकर, गणेश लंगोट, ब्रह्मानंद जाधव, उत्तम कसबे,केएस रेड्डी आदी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *