माधुरी गीते यांना पीएच.डी.

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१४ जानेवरी २०२२

पुणे


पुणे येथील माधुरी भाऊसाहेब गीते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी.ची पदवी जाहीर केली आहे. त्यांनी ‘नव्वदोत्तर मराठी कवयित्रींच्या कवितेतील महानगरीय संवेदना’ या विषयावर विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. त्यांना या प्रबंधासाठी घोडेगाव येथील बी.डी. काळे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी मार्गदर्शन केले आहे. डॉ.माधुरी भाऊसाहेब गिते या गृहीणी असून त्यांचा कोणताही शैक्षणिक स्वार्थ नसताना निस्वार्थी अभ्यासूपणामुळे त्यांनी आपले संशोधन कार्य निष्ठेने पूर्ण केले आहे.

त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च आचार्य पदवी, विद्यावाचस्पती पदवी (पीएच.डी.) संपादन केल्यामुळे त्यांच्या या यशाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, मराठी विभागाचे प्रमुख डॉ.प्रभाकर देसाई, डॉ.तुकाराम रोंगटे, डॉ.विद्यागौरी टिळक,डॉ. रवींद्र ठाकूर,डॉ.धनंजय मंडलिक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *