हॉटेल चालकांची बाटलीबंद पाण्याची सक्ती

०२ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा ग्राहकाला पाणी दिले जाते . पण , पिंपरी – चिंचवडमधील काही हॉटेलमध्ये प्रत्येक ग्राहकाला बाटलीबंद पाण्याची सक्ती होत आहे . शहरातील दीड हजारपेक्षा जास्त हॉटेलांपैकी साधारण १ हजार हॉटेलचालकांकडून ग्लासमधून पाणी देण्यासाठी टाळाटाळ केली जाते . हॉटेलला प्रत्येक पाण्याच्या बाटलीमागे ३ ते ९ रुपयांचे कमिशन मिळते . दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे . हॉटेल परवानापत्र देताना अन्न व औषध प्रशासनाकडून अनेक अटी घातल्या जातात . त्यात पाणी द्यावे ही अट नाहीच . त्यामुळे अन्न व औषध प्रशासन खातेही या प्रकाराकडे लक्ष द्यायला तयार नाही.

जेवण, नाश्ता , मनमानी दराने विकणाऱ्यांना शुद्ध पाणी द्यावे , असे का वाटत नाही ? सक्ती करण्याचे धाडस अन्न प्रशासनाकडे नाही . पाणी शुद्ध द्या , असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. शुद्धिकरणाचा पर्याय पिण्याचे पाणी शुद्धिकरण करून न देण्यामागच्या कारणांचा शोध घेता अनेक बाबी समोर आल्या . पाणी शुद्धिकरण करून दिले तर २० रुपये लिटरचे मिनरल कम शुद्ध पाणी कोण घेणार ? त्यात प्रत्येक बाटलीमागचा नफा १० ते १२ रुपयांचा आहे . त्यावर का पाणी सोडा ? हा हॉटेलवाल्यांचा धूर्तपणा आहे . ‘ शुद्ध’चा आग्रह करणारे गप्पगुमान २० रुपये मोजून बाटली घेतात . इतरांनी काही बोलले तर सरळ नळाचे पाणी आहे , शुद्ध आहे ‘ असे उत्तर दिले जाते . याविरुद्ध अन्न प्रशासनाने थेट मोहीम हाती घेण्याची गरज आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *