प्रसिद्ध डॉ.राणी खेडीकर यांना कर्नाटकात सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
७ जानेवारी २०२२

ओझर


कर्नाटक राज्य सरकार शिक्षक संघ (एल), एजुकेशन हेल – लाइन चैरिटेबल ट्रस्ट शिक्षक सदन, बैंगलोर केम्पेगौड़ा रोड, बैंगलोर यांच्या द्वारे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात,डॉ राणी दुष्यंत खेडीकर यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला. डॉ. राणी खेडीकर या ठाण्यातील बालमानसतज्ञ आहेत. पालकत्व विषयावर त्यांनी राज्यभरात अनेक व्याख्याने दिली आहेत. राणीजींनी समाजातील उपेक्षित, शोषित वेश्यांच्या लहान मुलांवर पीएचडी मिळवली आहे. त्या मुलांचे आयुष्य किती असुरक्षित असते. त्यांना कोण कोणत्या अडचणींना सामना करावा लागतो.

या सर्वांचा विचार त्यांनी आपल्या अभ्यासात केला होता. हे करत असताना खेडीकर मॅडमने या विषया संदर्भात स्वतःला वाहून घेतले. मग त्यांनी या वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आज ती मुले मोठमोठ्या पदावर आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ते कार्यरत आहेत. अशाप्रकारे या मुलांमध्ये डॉ राणी खेडीकर यांनी अमुलाग्र बदल आणला आहे. त्याच बरोबर त्या काही शिक्षक संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी कविताही लिहिल्या आहेत. त्यांचे अनेक लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असतात, ‘लाल दिव्याच्या वस्तीवर’ या विषयावर त्यांनी एक कथासंग्रह प्रसिद्ध केला आहे. यासोबतच त्यांनी लघु पटांचे निर्मिती कार्य सुरू ठेवले आहे. त्यामधून शिक्षणाविषयीचे कार्य पुढे जात असते. म्हणून त्यांना हा सावित्रीबाई फुले पुरस्कार दिला गेला.

या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. उपाध्यक्ष  वनकल्लु मल्लेश्वर विद्यालय, बसवा रामानंद महा स्वामीजी, कर्नाटक सरकारचे ज्येष्ठ प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षा मंत्री, डबसपेट, पट्टादा शिवानंद शिवाचार्य महास्वामी चिक्कल्लू बालू मठ बी.सी. नागेश माननीय पूर्व मंत्री,  कृष्णाय्या शेट्टी प्रसिद्ध फिल्म अभिनेत्री अमृता अयंगर चैरिटेबल एकाउंटेंट, कोलकाता अध्यक्ष पृथ्वीराज वी., कर्नाटक राज्य प्रधानाध्यापक शिक्षक संघ, एक्ष कृष्णप्पा, अध्यक्ष, कर्नाटक राज्य ग्रामीण शिक्षक संघ,  अशोक सज्जन, चैरिटेबल एकाउंटेंट, डॉ. भास्कर, उपस्थित होते. संपूर्ण कार्यकारिणी,आणि आयोजक यांच्या अथक प्रयत्नांनी इतका भव्य सोहळा यशस्वी रित्या पार पडला. अध्यक्ष डॉ बी. टी वेंकटेशा, उपाध्यक्ष डॉ सुमित्रा दुर्गी, डॉ मलकप्पा अलियास महेश त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *