जिल्हा बँकेवर अॕड संजय काळे बिनविरोध

पवन गाडेकर
निवासी संपादक
२२ डिसेंबर २०२१

जुन्नर


अॕड.संजय शिवाजीराव काळे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड संजय काळे यांचं शिक्षण एम.ए.एलएल.एम ,केंब्रीज (इंग्लंड) येथे झाले तर पुणे विद्यापीठातील ते गोल्ड मेडलिस्ट आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सतत १४ वर्ष ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून ते निवडून जात आहेत तर ४ वर्ष त्यांनी बँकेचे उपाध्यक्ष पद देखील यशस्वी पणे सांभाळलं आहे सध्या ते कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या उमेदवारीसाठी संजय काळे यांनी ३४ अर्ज दाखल केले होते.

अजितदादा पवार आणि आमदार अतुल बेनके यांच्या विनंती वरून मी माघार घेतली – रघुनाथ लेंडे

त्यांच्या विरोधात कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ आबाजी लेंडे यांनी अर्ज दाखल केला होता दिनांक २२ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दुपारी ३ वाजेपर्यंत माघारी घेण्याची मुदत होती लेंडे यांनी अंतिम क्षणी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सोसायटी च्या अ गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व काँग्रेस (Congres) पुरस्कृत सहकार पॅनल चे अधिकृत उमेदवार संजय काळे हे बिनविरोध निवडून आले. लेंडे यांनी माघार घ्यावी यासाठी महत्वाची भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,राष्ट्रवादी चे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश अप्पा थोरात आमदार अतुल बेनके, यांनी विशेष प्रयत्न केले तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही तालुक्यातील मतदारांची व सर्व सहकारातील कार्यकर्त्यांची व इच्छा होती.

जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करणार – अॕड संजय काळे

गेले ७५ वर्ष काळे घराण्याची जिल्हा बँकेच्या संचालक पदी वर्णी लागलेली आहे. पुन्हा एकदा संजय काळे यांची संचालक म्हणून निवड झाल्यामुळे तालुक्यात सहकारावर त्यांची पकड कायम असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यांच्या या निवडी मुळे तालुक्यातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि सहकारातील पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे भरवत आनंद साजरा केला.


बातमी प्रतिनिधी
निवासी संपादक – पवन गाडेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *