अशा भ्याड हल्ल्यांना घाबरत नाही- मनसे उपाध्यक्षा अनिता पांचाळ

प्रसन्न तरडे
बातमी प्रतिनिधी
१७ डिसेंबर २०२१

पिंपरी-चिंचवड


पिंपरीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तिघा जणांनी पांचाळ यांची गाडी फोडल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असतानाच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काय आहे प्रकरण? गुरुवार, १६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास मनसेच्या महिला उपाध्यक्ष अनिता पांचाळ यांच्या वाहनांची पाचपीर चौक काळेवाडी येथे त्याचा राहत्या घराजवळ पार्क करण्यात अली होती. पहाटे चार ते सव्वाचार दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ

ही घटना कळताच काळेवाडी परिसरातील मनसैनिकांनी पांचाळ यांच्या घरासमोर गर्दी केली होती. यावेळी बोलताना अनिता पांचाळ बोलाताना म्हणाल्या सदर घटना धक्कादायक असून आमचे कोणाशीही वैर नाही मात्र आपण अशा भेकड हल्ल्याना घाबरत नाही. आमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही असा इशारा अनिता पांचाळ यांनी दिला.

या प्रकरणी वाकड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घटना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. याच रागातून आपल्या कारची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप अनिता पांचाळ यांनी केला. पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी भागात अनिता पांचाळ राहतात. त्या आगामी महापालिका निवडणूक लढवण्यास अनुकूल असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा वावर त्या परिसरात वाढला आहे. कोयत्याने गाडीवर वार रस्त्याच्या कडेला त्यांनी पार्क केलेली मोटार आज पहाटेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याने वार करून फोडली. यात, त्यांच्या मोटारीचे नुकसान झाले आहे.

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले त्यांच्याशी संपर्क साधून बोलले असता झालेला प्रकार अतिशय निंदनीय असून निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार घडतच राहणार करून तो आम्ही गप्प बसणार नाही या प्रकरणाचा छडा लावण्याविषयी मी स्वतः पोलिसांशी बोललो असून गुन्हेगारांचा शोध सुरू आहे लवकरच गुन्हेगारांना पकडू असे पोलिसांनी सांगितले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *