टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी खेळाडूंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा…

जपानची राजधानी टोकियो शहरात आजपासून सुरु होत असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी जगभरातील सर्व खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन; स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी,स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी हार्दिक शुभेच्छा- अजित पवार-अध्यक्ष महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना

रोहित खर्गे
विभागीय संपादक

मुंबई – दि २३ जुलै २०२१
टोकियो ऑलिंपिकमध्ये १२६ खेळाडूंचा भारतीय संघ अठरा क्रीडाप्रकारात देशाला पदक जिंकून देण्यासाठी खेळणार आहे. आपल्या महाराष्ट्रातून १) राही सरनोबत, कोल्हापूर (खेळ-शुटींग-२५ मीटर पिस्तूल), २) तेजस्वीनी सावंत, कोल्हापूर (खेळ-शुटींग-५० मीटर). ३) अविनाश साबळ, बीड (खेळ-अॅथलेटिक्स ३०००मीटर स्टिपलचेस). ४) प्रविण जाधव, सातारा (खेळ-आर्चरी), ५) चिराग शेट्टी, मुंबई (खेळ-बॅडमिंटन पुरुष दुहेरी), ६) विष्णू सरवानन, मुंबई (खेळ-सेलिंग), ७) स्वरुप उन्हाळकर, कोल्हापूर (खेळ-पॅरा शुटिंग-१० मीटर रायफल), ८) सुयश जाधव, सोलापूर, (खेळ-पॅरा स्विमर-५० मीटर बटर फ्लाय, २०० मीटर वैयक्तिक मिडले) हे आठ खेळाडू देशाला ऑलिंपिक पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतील.आपल्या उत्तम कामगिरीने, खिलाडूवृत्तींने राज्याचा, देशाचा गौरव वाढवतील असा विश्वास आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो.

ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होत भारतीय संघातील खेळाडूंना, क्रीडा कार्यकर्त्यांना, क्रीडा रसिकांना टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या मन:पूर्वक शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *