नारायणगावात ‘ओमीक्रॉन’ चे ७ रुग्ण आढळले. दुबईला पर्यटनसाठी गेले होते.

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१७ डिसेंबर २०२१

जुन्नर


बेल्हे

दुबईला पर्यटनसाठी गेलेले नारायणगावातील ७ नागरिक ‘ओमीक्रॉन’ पॉझीटीव्ह

नारायणगाव (ता.जुन्नर) येथील १६ रहिवासी दुबई येथे पर्यटनासाठी गेलेल्या ७ व्यक्तींचे अहवाल OMICRON पॉझिटिव्ह आले आहेत.दुबई वरून आल्यावर त्यांचे तात्काळ लोकांचे rt-pcr नमुने घेण्यात आले.सदर नमुने हे दिनांक १२ डिसेंम्बर रोजी पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते.त्यापैकी एकूण ७ व्यक्तींचे नमुने आज (दि १७) रोजी OMICRON पॉझिटिव्ह आले. सदर सर्व रुग्णांना ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दाखल करण्यात आले आहे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचे RT-PCR नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी येथे घेण्यात आलेले आहे. पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहे.या रुग्णामध्ये सौम्य लक्षणे असून सदर रुग्णांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालय येथे क्वारेंटाईन करण्यात आले आहे.अशी माहिती आरोग्य अधिकारी उमेश गोडे व वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *