मुंबईत विना मास्कचा फटका आमदाराला; रीतसर भरावा लागला दंड

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ डिसेंबर २०२१

मुंबई


विना मास्क फिरणाऱ्या भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर पोलीसांनी कारवाई केली. मंत्रालयातुन बाहेर पडताना मास्क नसल्यानं ही कारवाई करण्यात आली. मंगेश चव्हाण यांना पोलीसांनी २०० रुपयांचा दंड ठोठवला. आमदारांवर कारवाई करणाऱ्या पोलीसांचं मंत्रालयात कौतुक होत आहे. राज्यावर कोरोनाच्या उत्पपरिवर्तीत नव्याओमायक्रॉन विषाणूचे संकट आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य  सरकारकडून कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केले आहे. पण, लोकप्रतिनिधींना या नियमांचा विसर पडला आहे. मंत्रालयात पोलिसांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर मंगळवारी कारवाई केली.

मंगेश चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत.  मंत्रालयातून बाहेर पडताना तोंडावर मास्क नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी २०० रुपयांचा दंड ठोकला आहे. आमदारांवर कारवाई करणाऱ्या कर्तव्य दक्ष पोलिसांचे मंत्रालयात कौतुक होतं आहे. मंगेश चव्हाण यांनीही नियम हे सर्वांना सारखेच असतात असे म्हणत काही आढेवेढे न घेता दंड भरला. दरम्यान, महाराष्ट्रावर ओमायक्रॉनचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. अशीच कारवाई इतर ठिकाणीही व्हावी असे नागरिकांना वाटते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *