3 लाख 30 हजार किमतीची ११ तोळे वजनाची सोन्याची चैन पळवणा-यास अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

घोडेगाव पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलिस स्टेशच्या हद्दित असलेले डिंभे खुर्द येथे हेमलता घोलप यांच्या शिवकृपा निवासस्थान येथे ९ जणांनी अनाधिकाराने प्रवेश करून घरातील व्यक्तिंना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ११ तोळे वजनाची सोन्याची चैन बळजबरीने ओढून घेऊन फरार झालेला मुख्य आरोपी युवराज दशरथ गेंगजे यास घोडेगाव पोलीस ठाण्याचे
सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने तसेच तैनाथ चार पोलिस पथकाच्या टिमने आपला जीव धोक्यात घालुन पुर आलेल्या ओढ्याच्या पाण्यात उतरुन,पाठलाग करत अरोपीस
जेरबंद केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार , १ ऑगस्टपासून हा आरोपी सापडलेला नव्हता,कैलास उर्फ बापू दशरथ गेंगजे यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील अरोपी डिंभे खु येथील हेमलता घोलप यांची मुले असल्याचा राग मनात धरुन ९ जणांनीअनाधिकाराने प्रवेश करत घरातील व्यक्तीनां शिवीगाळ दमदाटी, धमकी देत ,संतोष घोलप यांच्या गळ्यातील 3 लाख 30 हजार किमतीची ११ तोळे वजनाची सोन्याची चैन बळजबरीने ओढून घेवून गेला असल्याची फिर्याद हेमलता घोलप यांनी दिली होती.आखेर गुप्त बातमीदारामार्फत मुख्य अरोपी हा त्याच्या गावी येणार असल्याची पोलिसांना खबर लागताच त्याला शोधण्यासाठी चार पोलीस पथम टीम तैनात करून जोखीख घेत,पुर आलेल्या ओढ्याच्या पाण्यात उतरुन,पाठलाग करत अरोपीस पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. या वेळी पोना अविनाश कालेकर , जालिंदर राहणे , संदीप लांडे ,दत्तात्रय जढर, संदीप रसाळ , पो कॉ नामदेव ढेंगळे ,होमगार्ड स्वप्नील कानडे यांचे अथक परिश्रम लाभले या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *