जुन्नर (वार्ताहर):-
बेल्हे (ता.जुन्नर) प्रशासनाच्या वतीने बेल्हे गावात सर्वेक्षण केले.सर्वेक्षणातून आढळलेल्या ८१ संशयीत रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे येथे रॅपीड करोना टेस्टसाठी पाठविण्यात आले होते. त्यात बेल्हे गावातील मोरया चौक सुतारवाडा येथील ३ रुग्ण , मुक्ताई मंदिर ते बोरी रोडवरील वस्ती २ रुग्ण, नगर हायवे रुग्ण २, व बाजारआळी येथे १ रुग्ण असे एकुण ८ रूग्न करोना पाॅझीटीव्ह रुग्ण गावात आढळून आले. तर रानमळा, साकोरी, आणे येथील प्रत्येकी एक रूग्न करोना टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आढळून आले.
असे एकुण ११ रूग्न बेल्हे आरोग्य केंद्रात तपासणी करून अहवाल पाॅझिटीव्ह आला असल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष थोरात यांनी दिली.या पॉझिटिव्ह रुग्णांना पुढील उपचारासाठी लेण्याद्री व ओझर येथील कोविडं सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे.