पुर्णानगर येथील मार्गदर्शन मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद; नगरसेवक एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१३ डिसेंबर २०२१

पिंपरी


मेळाव्यात 400 नागरिकांनी घेतला लाभ

सोसायटीतील विविध समस्या सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक ११ पूर्णानगरचे नगरसेवक, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. पूर्णानगर येथील शनी मंदिर ग्राउंड पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडा संकुल येथे रविवारी (दि.12) हा मेळावा पार पडला. मेळाव्यासाठी सुमारे 400 नागरिक उपस्थित होते. गृहनिर्माण संस्था ट्रान्स्फर डीड, सेल डीड, कन्व्हेयन्स डीड, वाढीव एफएसआय, सोसायटी रजिस्ट्रेशन, सोसायटी ऑडीट या चार विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक एकनाथ पवार यांनी केले. त्यात त्यांनी वरील चार विषय हे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे असल्याचे सांगितले. एकनाथ पवार यांनी प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन प्रत्येक सोसायट्यांना हे विषय समजावून सांगितले आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. एकाच ठिकाणी सर्वांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळावे या हेतूने हा मेळावा भरवण्यात आला. ‘नागरिकांनी, सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी यांनी या मेळाव्याचा, मार्गदर्शनाचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि भविष्यात त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्याही आम्ही सोडवू असे आश्वासन एकनाथ पवार यांनी दिले.

या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मकरंद निकम, भूमि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, माहिती सल्लागार सारंग कामतेकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

पालिकेचे मुख्य अभियंता मकरंद निकम यांनी सोसायट्यांचे कन्व्हेयन्स डीड कशा पद्धतीने करून घ्यायचे आणि त्यावर येणाऱ्या समस्या काय आहेत हे समजावून सांगितले. तसेच त्याला लागणारे जे पेपर असतात ते योग्य ठिकाणी आपण जोडून दिले तर खूप कमी वेळात ही प्रक्रिया पूर्ण होऊन सोसायट्यांची कामे होतात. कन्व्हेयन्स डीड झाल्यामुळे सोसायट्याचे सभासद हे त्या जागेचे पूर्णपणे मालक होतात आणि बिल्डर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही असा महत्त्वपूर्ण सल्ला निकम यांनी दिला.

प्रशांत जोशी म्हणाले की, सोसायट्यांना येणाऱ्या ज्या अनेक समस्या असतात त्या सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये एक खिडकी योजना तयार केली असून तिच्या माध्यमातून आपण सोसायट्यांची वेगवेगळी कामे मार्गी लावू शकतो, असे सांगितले. तसेच सोसायट्यांमध्ये असणारे सेल डीड, लीज डीड यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले.

सारंग कामतेकर म्हणाले की, सोसायट्यांमध्ये असणाऱ्या कुरघोड्या थांबवल्या तर अनेक कामे आपोआप मार्गी लागतात. वाढीव एफएसआय सोसायट्यांनी त्याचा कशा पद्धतीने उपयोग करून घ्यायचा, त्याचबरोबर सोसायटीमध्ये सेल डीड, वाढीव एफएसआय तसेच ट्रान्सफर आणि सध्या प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्यामध्ये समन्वय साधून नागरिकांची कामे कशी सोप्या पद्धतीने करता येतील यासाठी वारंवार अशा प्रकारचे मेळावे घेऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्याचा मानस कामतेकर यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक ११ मधील पूर्णानगर, शिवतेजनगर ,फुलेनगर, शरदनगर, कृष्णानगर या विभागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष अजय पताडे, पोपट हजारे, निगडी मंडळाचे अध्यक्ष महादेव कवितके, गोरख पाटील, निगडी चिखली मंडळ सरचिटणीस बाळासाहेब गंगावणे, पूर्णानगर अध्यक्ष श्रीकांत कदम, मनीष चुडासमा, संजय केसकर, केटी पाटील, संजय रोकडे, अनिकेत बाबर, सुदीप नायर, शशिकांत जगताप, निगडी मंडळ अध्यक्षा महिला आघाडी कविता हिंगे, उपाध्यक्ष महिला आघाडी पिंपरी चिंचवड शहर अश्विनी शिंदे, महिला आघाडी सरचिटणीस पूर्णानगर आदी कार्यकर्त्यांनी मेळावा यशस्वी केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केले. पोपट हजारे यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *