जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

दि ५ जून २०२१
पिंपळे गुरव-
देशात वृक्षांच्या नावाने लौकिक असलेले पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर आहे.शहराच्या नावाप्रमाणेच पिंपळ- चिंच- आणि वड या देशी वृक्षांची पाच हजार झाडांची लागवड करण्याचा संकल्प आज शनिवारी ५ जून २०२१ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संकल्प लोकप्रिय आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांनी राजमाता जिजाऊ गार्डन येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रम प्रसंगी केला.


शहरातील वृक्षांची संख्या वाढवावी हिरवेगार पिंपरी चिंचवड,प्रदूषण मुक्त पिंपरी-चिंचवड करण्याकरिता पर्यावरण प्रेमी,वृक्षप्रेमी,लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाने एकत्रित येऊन सहकार्याने कार्य केल्यास शहर सुंदर व हिरवेगार ठेवता येईल असे मत आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांनी मांडले.
सदर वृक्षारोपण प्रसंगी नगरसेवक शशिकांत आप्पा कदम,नगरसेवक सागर आंगोळकर,सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे,संजय गांधी निराधार योजना समितीचे संजय मराठे,नवीन लायगुडे,श्रीगणेश सहकारी बँकेचे संचालक मारुती तरटे,पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त व उद्यान विभागाचे प्रमुख सुभाष इंगळे,उद्यान विभागाचे अधिकारी गोसावी,स्थापत्य विभागाचे उपअभियंता चंद्रकांत मोरे,राहुल पाटील व शिर्के आणि कंपनीचे विजय बांदल व शहरातील पर्यावरण व वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *