घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काढा वाहन परवाना

०५ डिसेंबर २०२२

पिंपरी


परिवहन विभागाने त्यांच्याकडील सर्व सेवा आता ‘फेसलेस’ म्हणजेच ऑनलाइन केल्यामुळे नागरिकांना फायदा झाला आहे. लायसन्स म्हणजेच वाहन चालविण्याचा परवाना काढणे देखील आता खूप सोपे झाले आहे. त्यासाठीची आवश्यक असलेली चाचणी परीक्षा देखील नागरिकांना घरबसल्या देता येते. पक्क्या परवान्यासाठी नागरिकांना संबंधित आरटीओच्या कार्यालयात जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा (वाहन चालवून) द्यावी लागते. पुणे शहरात आळंदी रस्ता येथील आरटीओ कार्यालय आणि पिंपरी-चिंचवड येथील आयडीटीआर येथे वाहनचालकांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. कच्चा परवाना मात्र नागरिकांना घरबसल्याच काढता येत आहे.

परवाना काढण्याची प्रक्रिया –
www.parivahan.gov.in हे संकेतस्थळ उघडल्यावर त्यामध्ये लायसन्स रिलेटेड सर्व्हिस असा ऑप्शन येतो. त्यावर क्लिक केल्यावर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करावे. त्यानंतर कच्च्या परवान्याबाबत माहिती देणारी साइट ओपन होते. ही साइट ओपन झाल्यावर आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रे यांची माहिती भरल्यानंतर वाहनचालकांना कच्च्या परवान्याची चाचणी परीक्षा देता येते. या कच्च्या परवान्याला सहा महिन्यांची अंतिम मुदत असते, त्या मुदतीच्या आत पुन्हा पक्क्या परवान्यासाठी वाहनचालकांना अर्ज करून 6 महिन्याच्या आत प्रात्यक्षिक परीक्षा देणे आवश्यक असते. अन्यथा कच्चा परवाना रद्द होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *