दि. ०४/०१/२०२३
मुंबई
मुंबई : अनेकदा अपुऱ्या नि उत्तान कपड्यांमध्ये वावरणारी उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद आता सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये अधिक वाढत चालला आहे. त्यामुळे वाचकांची करमणूक होता आहे.
अलीकडेच उर्फीने जे अपुरे कपडे घालून फोटो शूट केले होते. ते पाहिल्यानंतर चित्र वाघ यांनी तिच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर तिने नमते घेण्याऐवजी ट्विटरवर एका पोस्ट करून चित्रा वाघ यांना डिवचले आहे. उर्फीने एक पोस्ट लिहीत चित्रा वाघ यांच्यवर निशाणा साधला. मला माहीत आहे की राजकारण्यांविरोधात असे पोस्ट अपलोड करणं खूप धोकादायक आहे. पण या लोकांमुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. एकतर मी स्वत:चा जीव तरी घेईन किंवा मग माझ्या मनातलं बोलेन आणि त्यांच्याद्वारे मारली जाईन. मात्र या सगळ्याची सुरुवात मी केली नाही. मी कधीच कोणासोबत काही चुकीचं केलं नाही. ही लोकं विनाकारण माझ्या मागे लागली आहेत’, असं उर्फीने लिहिलंय.उर्फीने या आधीच्या पोस्टमध्ये चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्या मैत्रीचा उल्लेख केला. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना तुम्ही संजय राठोडच्या अटकेसाठी हल्लाबोल केला होता. मात्र आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोघांची मैत्री झाली. मीसुद्धा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करेन. त्यानंतर आपली सद्धा चांगली मैत्री होईल,’ असे तिने चित्रा वाघ यांना उद्देशून लिहिले आहे.
याआधी सोशल मीडियावर पोस्ट लिहित उर्फीने चित्रा वाघ यांना आव्हान दिलं होतं. ‘जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे. एक राजकारणी किती आणि कुठून पैसा कमावतो हे आधी जगाला सांगा. वेळोवेळी तुमच्या पार्टीतील काही पुरुष कार्यकर्त्यांवर शोषणाचे आरोप झाले आहेत. याविषयी तुम्ही कधीच काही करताना दिसल्या नाहीत’, अशी पोस्ट तिने लिहिली होती.आता चित्रा वाघ उर्फीच्या या पोस्टला काय प्रत्युत्तर देणार ते लवकरच कळेल.