कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
१४ डिसेंबर २०२१

ओझर


कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर महाविद्यालयात पद्मविभूषण माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवस उत्साहात साजराकरण्यात आला.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात दिनांक ३ डिसेंबर ते १३ डिसेंबर या दरम्यान जेनेरिक प्लस फार्मसी व कोपिउस हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होण्यास हातभार लागेल ह्या हेतूने जेनेरिक मेडिसिन या विषयावर सेमिनार व मुलाखत यांचे आयोजन करण्यात आले. तसेच या मार्गदर्शन पर सत्राचे सूत्रसंचालन सौ. जयमाला कुमावत यांनी केले. दिनांक १०/१२/२०२१ रोजी प्रथम वर्ष पदवीका फार्मसी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक जे.पी .देसाई सर व प्राध्यापक साळुंखे सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला .या वेळी  जे.पी. देसाई सर यांनी विद्यार्थ्यांना संस्कृती कशी जपली पाहिजे तसेच माननीय बा.रा. घोलप साहेब यांची थोडक्यात ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा कटके व महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी यांनी केले.

प्राचार्या अश्विनी शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना सक्सेस या शब्दाची थोडक्यात ओळख करून दिली. इ-पोस्टर ,कविता वाचन ,ड्रामा व ॲक्टींग स्पर्धा, शुभेच्छा, पत्र लेखन, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा महाविद्यालयात घेण्यात आल्या. तसेच दिनांक ११/१२/२०२१ रोजी हडपसर येथील हेमंत करकरे उद्यान येथे माजी नगरसेवक श्री. सुनिल दादा बनकर यांच्या उपस्थित वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .यावेळी प्राचार्या अश्विनी शेवाळे , संजय बारगळ, शीला कुदळे, युनूस सय्यद,अभिषेक मेदनकार,देवयानी किरवे, सौदामिनी देशमुख ,रुपाली मुळे, प्रथम व द्वितीय वर्षांतील विद्यार्थी उपस्थित होते.

तसेच १२/१२/२०२१ रोजी महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन व स्टार्टअप प्रोजेक्ट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. अमोल दिंडोरकर, जनरल मॅनेजर श्रीरम इंस्टिट्यूट प्रोडुकशन डिपार्टमेंट व श्री. प्रितम शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले . त्यांनी vaccine production व pharmacy या एकमेकांशी पूरक आहेत याची ओळख करून दिली. तसेच सूर्यनमस्कार व सायकल स्पर्धा यांचे देखील आयोजन महाविद्यालयात करण्यात आले .यावेळी महाविद्यालयातील प्रथम वर्ष विभागातील विद्यार्थी तसेच द्वितीय विभागातील विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे या कार्यक्रमास उत्साहात सहभागी झाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *