अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने राजुरीत महावितरण कंपनीच्या विरोधात आक्रोश सभा

रामदास सांगळे
विभागीय संपादक
४ डिसेंबर २०२१

राजुरी


शेती पंप धारकांची थकबाकी ची बीले अचूकपणे दुरुस्त करा. बीले अचूकपणे दुरुस्त होण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची लेखी सूचना न देता वीज कनेक्शन तोडल्यास कृषी पंप धारक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन योग्य त्या प्राधिकरणाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करीन याची महावितरणने गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी यांनी राजुरी (ता.जुन्नर) येथील आक्रोश सभेत दिला. अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुक्याच्या वतीने वीज बिलाच्या दुरुस्ती बाबतच्या मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या विरोधात तक्रार भरो आंदोलन व आक्रोश सभेत बाळासाहेब औटी बोलत होते.

या आंदोलनाला पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर,जुन्नर तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे,राजुरी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अमित भरते, सहाय्यक अभियंता पवार,ऊर्जा समिती प्रमुख संतोष नेहरकर आदी मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब औटे पुढे म्हणाले, की गावोगावी वीज ग्राहकांचे मेळावे घेऊन कृषी पंपाचे सर्वेक्षण करावे त्याचबरोबर मिटर रिडींगमाने बिलिंग नसून वाजवी ज्यादा आकरणी केली जात आहे. रीडिंग एजन्सीला घरी जाऊन सूचना देण्यात याव्यात.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ५० टक्के सवलत योजनेखाली ही सवलत मिळणे. थकबाकी रक्कम करण्यापूर्वी खरी थकबाकी रक्कम निश्‍चित करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शेती पम्प. ग्राहकाने प्रथम वीज बिले दुरुस्ती साठी तक्रार नोंदवावी व वीज बिल दुरुस्ती नंतरच खऱ्या थकबाकीचा ५० टक्के रक्कम मार्च २०२२ अखेरपर्यंत भरावी. असे यावेळी बाळासाहेब औटी म्हणाले. वीजबिल सवलत योजना राबविताना राज्यातील सर्व शेती पंप वीज ग्राहकांची थकित वीज बिले तपासली जातील सर्व वीज बिले दुरुस्त करण्यात येतील. असे आश्वासन राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी संघटनांना दिले होते. तसे परिपत्रक १५ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर केले होते. तथापि या प्रमाणे दुरुस्ती कंपनी स्वतः  करणार नाही. हे आता स्पष्ट झाले आहे.त्यामुळे प्रत्येक शेती पंप वीज ग्राहकांनी वैयक्तिक तक्रार दाखल करावी लागेल याची नोंद शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता अमित भरते म्हणाले,” की राजुरी येथे आक्रोश सभेच्या निमित्ताने सर्वांची वीज बिले स्थल पहानी करून प्रत्यक्ष रीडिंग पाहून दुरुस्त केली जातील असे आश्वासन यांनी दिले. यावेळी जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातून सुमारे ३०० ते साडेतीनशे वीज ग्राहकांचे समस्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी राजुरी गावचे सरपंच प्रिया हाडवळे ज्ञानेश्वर शेळके, सभापती दीपक आवटी, माजी उपसरपंच मोहन हाडवळे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आभार अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *