जुन्नर तालुका होणार पर्यटन हब : आमदार अतुल बेनके

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
४ डिसेंबर २०२१

नारायणगाव


जुन्नर तालुका हा राज्यातील एकमेव पर्यटन तालुका असून यापुढे राज्यात शिवजन्मभूमी जुन्नर तालुका दर्जेदार पर्यटन हब होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे विभाग आयोजित “जुन्नर जबाबदार पर्यटन कार्यशाळा” आज शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र ओझर येथे आयोजित करण्यात आली. एवढे आमदार अतुल बेनके बोलत होते.

जुन्नर तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी प्राधान्य – अपर जिल्हाधिकारी विजय सिंह देशमुख

‘पुणे जिल्हा पर्यटन मॉडेल संकल्पना’ चे प्रमुख अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख तसेच जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व प्रशासनाच्या वतीने या अनोख्या जुन्नर जबाबदार पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी माजी आमदार शरद सोनवणे पर्यटन विभागा च्या सहाय्यक संचालक सुप्रिया करमरकर भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, विघ्नहर देवस्थान चे अध्यक्ष गणेश कवडे, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, ओझर च्या सरपंच मथुरा कवडे, इतिहास अभ्यासक प्रा. विनायक खोत, प्रा. लहू गायकवाड, मनोज हाडवळे, सुजित खैरे, पोलीस निरीक्षक किरण कबाडी, उद्योजक संजय वारुळे, सरपंच कल्पना वैभव काळे, वैशाली जाधव, महेश शेळके अभय वाव्हळ तसेच जुन्नर तालुक्यातील हॉटेल व्यवसायिक, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या पर्यटन विषयी प्रकल्पांची माहिती दिली. आगामी काळात जुन्नर तालुक्यात होणाऱ्या शिव-संस्कार सृष्टी, रोपवे, यशवंतराव चव्हाण पर्यटन केंद्र,लेपर्ड रीहँबिलीटेशन सेंटर, मिनी प्राणी संग्रहालय यासह विविध प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाच्या कार्यकाला मध्ये पर्यटन वाढीसाठी शासनदरबारी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केल्याचे सांगून जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी पुणे जिल्हा पर्यटन मॉडेल संकल्पना जुन्नर तालुक्यात कशा पद्धतीने प्रभावीपणे मांडता येईल व यातून जुन्नर तालुका पर्यटनाच्या बाबतीत कसा सक्षम होईल याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता वामन यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *