महिलेच्या अपघाती मृत्यू नंतर नारायणगाव बाह्यवळण रस्ता अद्यापही बंद

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२७ नोव्हेंबर २०२१

नारायणगाव


नारायणगाव खोडद भुयारी मार्ग करण्याचे आश्वासन दिले तरच करू देणार रस्ता सुरु

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बाह्यवळण रस्त्याच्या खोडद चौकात २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातात कल्पना योगेश भोर (वय २३) या महिलेचा शुक्रवार दिनांक २६ रोजी मृत्यू झाला. यामुळे हिवरे व खोडद ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी नारायणगाव बाह्यवळण रस्ता बंद केला. हा रस्ता अद्यापही बंद आहे.

NHAI चे अधिकारी चिटणीस यांच्या समवेत ग्रामस्थ व प्रशासनाची बैठक

अपघाताची घटना घडल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून खोडद बाह्यवळण रस्त्याच्या चौकात जोपर्यंत नारायणगाव ते खोडदकडे जाणारा भुयारी मार्ग होत नाही तोपर्यंत रस्ता रस्ता बंद ठेवावा अशी मागणी काल रात्री संतप्त आंदोलकांनी केली. या अनुषंगाने आज एन एच ए आय चे अधिकारी श्री. चिटणीस तसेच तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे व ग्रामस्थ यांच्यामध्ये आज नारायणगाव पोलिस स्थानकात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यानंतर हा रस्ता चालू होईल की नाही हे समजणार आहे. तूर्तास तरी या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *