शिवप्रसाद महाले यांच्या “रिचार्ज टू डिस्चार्ज” उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन मध्ये नोंद…केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्तेही सन्मान..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड :- दि ३१ ऑगस्ट गतवर्षी माहे मे २०२० मध्ये संपूर्ण जगभरासह महाराष्ट्रात कोव्हीड -१९ ने थैमान घातले होते. याप्रसंगी सर्वच नागरिक आजाराला घाबरुन भयभीत व प्रचंड तणावात होते. या आजारातुन दिलासा मिळावा म्हणून कोविड रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना आजारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवणे अत्यंत गरजेचे होते. यावेळी श्री. शिवप्रसाद पंडितराव महाले ( लाईफ कोच व समाजसेवक ) यांनी पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, जम्बो कोविड हॉस्पीटल, ऑटो क्लस्टर कोविड हॉस्पिटल व मनपाच्या इतर रुग्णालयात “ रिचार्ज टू डिस्चार्ज ” हा उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमा माध्यमातुन श्री महाले यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता प्रत्यक्ष आय.सी.यु. वार्डमध्ये जाऊन रुग्णांशी संवाद साधला. महाले यांच्या वरील कार्याची दखल जागतिक पातळीवरील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या ठिकाणी देखिल घेण्यात आली. या नोंदीबद्दल मिळालेला सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट ॲवार्ड डॉ. भारतीताई पवार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

याबाबत माहिती देताना महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे मनाधैर्य वाढविण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे, त्यांच्या आवडीची गाणी वाजवून त्यांचेकडून म्युजिकल एक्सरसाईज करुन घेणे, मेडिटेशन करुन घेणे व मोटीवेशन सेशन घेतले. या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये कमालीचा सकारात्मक बदल दिसुन आला. तसेच रुग्णांमध्ये कोरोना विरुध्द लढण्यासाठी अधिकचे बळ प्राप्त झाले. असा दाखला स्वत: कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांनी देखिल त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या सकारात्मक बदलाविषयी प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही भारतातील पहिली महापालिका ठरली. याअगोदर प्रथम मालेगाव येथे पोलिस प्रशासनाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी एक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणेत आला होता. या स्तुत्य अशा उपक्रमाची दखल केंद्रीय पातळीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारतीताई पवार यांनीही घेतली. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच श्री. महाले यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *