आजी माजी खासदार लग्न समारंभात एकत्र आले पण एकमेकांकडे न पाहता बैलगाड्या विषयी मात्र उपस्थितांना संबोधले

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१९ नोव्हेंबर २०२१

नारायणगाव


बैलगाडा शर्यतीचा मुद्दा सध्या राज्यात तसेच देशात देखील गाजत आहे. खेड तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक स्व. मच्छिंद्रशेठ बबनराव बोऱ्हाडे यांच्या नातवाच्या विवाह समारंभनिमित्त शिरूर लोकसभा मतदार संघातील आजी माजी खासदार नारायणगाव येथे उपस्थित होते. या विवाह समारंभासाठी बैलगाडा शौकीन देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे असताना बैलगाडा विषयावर बोलल्या वाचून दोन्ही खासदार कसे राहतील बरं…। याच अनुषंगाने नुकत्याच झालेल्या बोऱ्हाडे आणि वाजगे या शुभ मंगल प्रसंगी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बैलगाड्या विषयावर लग्न सोहळ्यात मध्येच आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शौकिनां बरोबर चर्चा देखील केली. याशिवाय खासदार कोल्हे यांनी लग्नानिमित्त उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींना सेल्फी काढण्याची संधी देखील दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *