म्हाळसाकांत सिंचन योजनेचा कुकडी प्रकल्पात होणार सामावेश

सदानंद शेवाळे
विभागीय संपादक
०५ मे २०२२


आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या लोणी धामणी परिसरातील वरदान ठरणाऱ्या म्हाळसाकांत सिंचन योजना आता प्रत्यक्षात साकारणार असून या योजनेचा कुकडी प्रकल्पात समावेश करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या वतीने प्रस्ताविक म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेचा कुकडी प्रकल्पात समावेश करणे बाबत सर्वेक्षणास मान्यता दिली असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

या परिसरातील शेतीसाठी शाश्वत सिंचन योजना व्हावी अशी नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती याबाबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील हे सातत्याने पाठपुरावा करत होते या योजनेसंदर्भात मंत्रालयात येथे ३० नोव्हेंबर २०१९ रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली होती. तत्त्वतः मान्यता मिळाल्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *