उपमहापौर हिराबाई घुले यांना मिळाला महापौरपदाचा बहुमान

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ नोव्हेंबर २०२१

पिंपरी-चिंचवड


पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांना आज मा.महापालिका सर्वसाधारण सभेच्या (सोमवारी) पीठासीन अधिकारीपदाचा बहुमान मिळाला. तसेच महापौर म्हणून मा. महापालिका सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविण्याची संधी देखील मिळाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या कामकाजात सभा शास्त्राचे पालन करुन घुले यांनी पीठासीन अधिकारी पदाचे कर्तव्य पार पाडत कामकाजाच्या माध्यमातून चुणूक दाखवून दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची मासिक मा. महापालिका सर्वसाधारण सभा आज यशवंतराव चव्हाण (मा.महापालिका सभागृह) येथे आयोजित केली होती. काही कारणास्तव महापौर सौ. उषा ढोरे गैरहजर होत्या. त्यामुळे उपमहापौर घुले यांना महापौर म्हणून मा. महापालिका सभा कामकाज चालविण्याची संधी मिळाली. हिराबाई घुले यांची २३ मार्च २०२१ रोजी शहराच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. उपमहापौर घुले यांनी दिघी-बोपखेलसह शहरातील विविध प्रश्नांमध्ये लक्ष घातले. प्रश्न सोडविण्यासाठी त्या नेहमी आग्रही असतात. त्यांच्या कार्यालयात नेहमी नागरिकांचा राबता असतो. तसेच येणा-या प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणी, समस्यांची आपुलकीने विचारपूस करतात. महापालिकेच्या सार्वजनिक कार्यक्रम, बैठका व इतर महापालिकेसंबंधी कामकाजामध्ये महापौरांसह त्या आवर्जुन उपस्थित असतात. याशिवाय खासगी कार्यक्रमांनाही त्या न चुकता हजर राहतात.

उपमहापौर हिराबाई घुले यांना मिळाला महापौरपदाचा बहुमान

आजच्या मा. महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. हातवर करणा-या प्रत्येकाला बोलण्याची देखील त्यांनी संधी दिली. नगरसदस्य मोरेश्वर शेडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी चर्चेत सहभाग घेतला. श्रद्धांजलीसंबंधी गंभीर वातावरण असतानाही उपमहापौर घुले यांनी सभा कामकाज योग्य पद्धतीने हाताळले. तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव मंजूर करुन आजची मा.महापालिका सर्वसाधारण सभा गुरुवार (दि. १८ नोव्हेंबर २०२१) रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केल्याचे उपमहापौर घुले यांनी जाहीर केले.

याबाबत बोलताना उपमहापौर हिराबाई घुले म्हणाले, ”मा.महापालिका सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविण्याची संधी आज मला मिळाली. अर्ध्या तासात चाललेल्या सभेचे कामकाज सभाशास्त्राप्रमाणे नियमानुसार चालविले. पीठासीन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल महापौर, पक्षनेतृत्वाचे मी आभार मानते”.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *