गोपाळ पवार यांच्यावर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद…

दि. २२ मे २०२१
ठिकाण : वैष्णवधाम
प्रतिनिधी : लक्ष्मण दातखिळे

जुन्नर तालुक्यातील आदर्श गाव वैष्णवधाम येथे सायंकाळच्या वेळी आपल्या दोन मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेलेल्या श्री. गोपाळ ज्ञानेश्वर पवार यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. पुणे जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्या वैष्णवधाम गावातील स्मशानभूमी जवळच्या रस्त्यावर मंगळवार दि. १८ मे रोजी संध्याकाळी ०७.३० च्या सुमारास ही घटना घडली होती.
गोपाळ पवार यांच्या दंडाला बिबट्याने चावा घेतल्याने चार दात लागून खोलवर जखम झाली होती.


त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी जि. प. सदस्या आशाताई बुचके व गावच्या ग्रामस्थांनी केली होती. या नुसार १९ तारखेला वनविभागाच्या टीमने तत्काळ पिंजरा लावला व आज दि. २२ मे रोजी सकाळी बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
या परिसरात बिबट्याचे दिवसाढवळ्या दर्शन होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी वनविभागाला धन्यवाद देत समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *