महापालिका विषय समिती सभापतींच्या निवडणुकीत मर्जीतील दोन सभापतींना पुन्हा संधी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१३ नोव्हेंबर २०२१ 

पिंपरी चिंचवड


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपचे बहुतेक सर्वांना संधी देण्याचे धोरण अवलंबले असल्याचे बोलले जाते. पण आज शुक्रवारी (दि १२ नोव्हेंबर) पाच विषय समिती सभापतीपदासाठी केवळ सत्ताधारी भाजप उमेदवारांचेच अर्ज आले आहेत. भाजपमध्ये सर्वाना संधी देण्याचे धोरण असतानाही क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीसाठी प्रा. उत्तम केंदळे आणि विधी समितीसाठी स्वीनल म्हेत्रे या मर्जीतील सभापतींची पुन्हा वर्णी लागली आहे. त्यामुळे सर्वाना संधी देत असल्याच्या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या.

महिला व बालकल्याण समितीसाठी सविता खुळे, शहर सुधारणा समितीसाठी अनुराधा गोरखे आणि शिक्षण समितीसाठी माधवी राजापूरे यांचे अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादी कडून अर्ज न आल्यामुळे १८ नोव्हेंबर रोजी भाजप उमेदवारांची ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. केवळ सत्ताधारी भाजपचेच अर्ज आल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दि १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विषय समितीच्या सभापतींची महापालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हनून पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमणार कामकाज पाहणार आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *