शिरोली गावात हिंदू-मुस्लिम बांधवांचा एकत्र गणेश उत्सव

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
३१ ऑगस्ट २०२२

बेल्हे


गणेशोत्सवाला आज सुरुवात झाली असून आज बाप्पाचं आगमन झालं आहे. जुन्नर तालुक्यात हिंदू- मुस्लिम बांधवांकडून नेहमीच सर्वधर्मसमभाव जपला जातो. एकमेकांच्या सणांचा आणि धर्माचा आदर राखला जातो. शिरोली तर्फे आळे (ता.जुन्नर) येथील मुक्ताई मंदिरात गणरायाच्या स्थापने करिता गणेशाच्या मुर्तीचे आगमन शिरोली गावातील हिंदु- मुस्लिम बांधवांनी एकत्रित करून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले.गावात आज गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाचं सकाळचं चित्र हे सर्व धर्म समभाव दाखविणारे होते.हिंदू – मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सर्व सण उत्सव साजरे करून सर्वधर्म समभाव जपला पाहिजे


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *