लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिलेली चिमुकल्या वेदीकाने घेतला अखेरचा श्वास…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

भोसरी – दि १ ऑगस्ट २०२१
भोसरी येथील वेदिका सौरव शिंदे हिच्या वडिलांनी व कुटुंबीयांनी तिला झालेल्या दुर्घर आजारातून बरे होण्यासाठी लोकवर्गणीतून तब्बल १६ कोटी रुपये जमवले होते. व तिला इंजेक्शन दिले होते पण आज सायंकाळी अचानक ती खेळत असताना तिला श्वासाचा त्रास झाला. तिच्या उजव्या लँग्ज मध्ये श्वास घेण्यास त्रास झाला व तिला तिच्या पालकांनी पटकन खाजगी रुग्णालयात हलवले. ती तब्बल एक तास मृत्यूशी झुंज देत होती. डॉक्टर शक्य तेव्हडे प्रयत्न करत होते पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही व त्या चिमुकल्या जिवाने अखेरचा श्वास घेतला.
काहीच दिवसांपूर्वी वेदीकाचे वडील सौरव शिंदे यांनी व वेदीकाचे आई व आजोबांनी तिच्या उपचारासाठी १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन बाहेर देशातून मागवण्यासाठीचे आवाहन जनतेकडे केले होते. त्यांच्या आवाहनाला साद देत जनतेने भरभरून प्रतिसाद दिला व सर्वच थरातून तिला मदतीचा ओघ सुरू झाला. आपला आवजच्या वतीनेही व इतर वृत्त वाहिन्या व वृत्तपत्रातून, पोर्टलच्या माध्यमातूनही मदतीचे आवाहन केले होते. जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या वतीनेही वेदीकला मदतीचा हात दिला होता. वेदीकासाठी शिरूर चे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनीही तिची कस्टम ड्युटी माफ करण्यासाठी व मदतीसाठी लोकसभेत आवाज उठवला व पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकार ला मदतीचे आवाहन केले होते. व त्या इंजेक्शनची कस्टम ड्युटी माफ करून घेतली. सगळीकडूनच म्हणजे राजकीय , मीडिया, सामाजिक, क्रीडा , सांस्कृतिक सर्वच क्षेत्रातून मदतीचा ओघ सुरू झाला आणि पाहता पाहता तब्बल १६ कोटी ही अशक्यप्राय रक्कम लोकवर्गणीतून जमा झाली . आणि इंजेक्शन भारतात आले. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर इंजेक्शन देऊन पुढील उपचार घेऊन वेदिका पूर्ण बरी होऊन घरी आली होती.
सगळे वेवस्थित सुरू आहे असे वाटत असतानाच आज काळाने वेदीकवर झडप घातली व खाजगी रुग्णालयात अखेरचा निरोप घेतला . ही बातमी समजताच सगळीकडे हळहळ वेक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *