पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या निवडणुकीत पिंपरी चिंचवडचे सर्वपक्षीय नऊच्या नऊ उमेदवार विजयी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१३ नोव्हेंबर २०२१ 

पिंपरी


पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नियोजन समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे सहा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तीन असे शहरातील नऊ उमेदवार पक्षाने व्हीप बाजावल्यामुळे निवडून आले. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप निवडणुकीच्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासूनच पालिकेत ठाण मांडून होते. त्यांनी मतदानाच्या दिवशी भाजपच्या सर्व नगरसेवकांकडून मतदान करवून घेतले. त्यांच्या प्रमाणेच राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटीलही पालिकेत बसून होते व त्यांनी त्यांच्या तीनही उमेदवारांना निवडून आणले.

सत्ताधारी भाजपकडून चिंचवडचे तीन पक्षनेते नामदेव ढाके, संदीप कास्पटे आणि चंद्रकांत नखाते तर भोसरीमधून दोन वसंत बोराटे आणि निर्मला गायकवाड तर पिंपरीतून एक जयश्री गावडे असे सहा उमेदवार रिंगणात उतरवले होते. व सर्वच्या सर्व निवडून आले. राष्ट्रवादी चे तीन अजित गव्हाणे, डॉ वैशाली घोडेकर आणि मोरेश्वर भोंडवे हे तीनही उमेदवार निवडून आले.या निवडणुकीत पक्षाने व्हीप बाजावल्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पक्षातील उमेदवारालाच मतदान केल्याने घोडेबाजार होऊ शकला नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *