ताम्हिणी घाट दुर्गम भागातील वंचितांची दिवाळी भूगोल फाउंडेशन ने केली गोड

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३ नोव्हेंबर २०२१

मोशी


भूगोल फाउंडेशन व संतनगर मित्र मंडळ च्या माणुसकीचा दिप म्हणजे दिवाळी या उपक्रमा अंतर्गत दि १ नोव्हेंबर वसुबारस दिनी मुळशी तालुक्यातील माले (ताम्हिणी घाट परिसरातील) या गावातील डोंगर दऱ्यातील दुर्गम भागातील आदिवासी व मागासलेल्या भागातील माले रामवाडी, माले मधलेवाडी, माले मुळशीखिंड या वस्तीवर दिवाळीचा फराळ, नवीन साड्या व कपडे वाटप कार्यक्रम तेथील सरपंच श्री सुहास रामचंद्र शेंडे, उपसरपंच हनुमंत धोडिंबा ठकोरे,मा.ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तुकाराम घारे,भरत चंद्रकांत काळोखे, नितीन ज्ञानदेव जोरी ,तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव व स्थानिक रहिवाशी महिला मूळशी खिंड येथील लीलाबाई देविदास वाघमारे, रामवाडी येथील हिराबाई कोंडिबा गोळे, पातेरी हिलम तांबड्या,शालुबाई विठ्ठल ठकोरे,मधलेवाडी मधील सविता बबन ढमाले, शोभा संतोष कडव,शांता भगवान नलावडे अशा अनेक महिला व पुरूष,लहान मुले मुली या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला.

ताम्हिणी घाट दुर्गम भागातील वंचितांची दिवाळी भूगोल फाउंडेशन ने केली गोड

यावेळी भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विठ्ठल झुंबरशेठ वाळुंज यांनी सांगितले की गेल्या जवळपास २ वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे भारतभर जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांच्या संसाराची वाताहत झाली, अनेक मुले-मुली अनाथ झाले .अनेक दानशूर मंडळी पुढे आली आणि वेगवेगळ्या स्वरूपात मदत केली .आपणही समाजाचे काही न काही देणे लागतो म्हणून गरीब अनाथ, विधवा, गरजुंना दिवाळीमध्ये फराळ व कपडे वाटप करून त्यांचे बरोबर आनंद साजरा करत आहोत. तरी आपण सर्वांनी प्रत्येकी खारीचा वाटा उचलून एकमेकांना हात देऊन एक चांगले काम केल्याचा आनंद मिळत आहे. तसेच भूगोल फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण,गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन, वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन,जनजागरण, जनप्रबोधन ,प्लास्टिकमुक्ती व समाजप्रबोधनपर माहिती आणि संदेश याची माहिती देऊन आपली वनसंपदा जतन करण्याचे आवाहन केले.येथील वाडीवस्तीवरील स्रियांना साडी व दिवाळीच्या फराळाचे किट देऊन एक माणुसकीचा व मदतीचा हात देण्यात आला. अति दुर्गम डोंगराळ भागातील गरीब स्रियांनाही साड्या व फराळाचे किट वाटप केले, पुरुषांना कपडे, टी शर्ट, लहान मुला मुलींची कपडे व मिठाई वाटण्यात आली. यावेळी मुलांना कपडे व फराळ वाटप करताना या गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून आपण केलेल्या मदतीची एक पावती मिळाल्याचे समाधान मिळाले.

आपण केलेली मदत वंचितापर्यंत पोहचविली व यापुढेही अश्या प्रकारचे उपक्रम करण्यास अजुन ऊर्जा मिळाली. या वस्तीवर असलेल्या गाईंची पूजा करुन आणि गाईंनाही गोड पदार्थ देऊन वसुबारस त्यांच्याबरोबर साजरी केल्याचा आनंदही मिळाला. यंदाची दिवाळी खास अनाथ आश्रम किंवा गावखेड्यात गरजूपर्यंत *चला देऊया एक हात मदतीचा* हा उपक्रम सफल झाला. यापुढेही असाच मदतीचा हात एकमेकांना देऊया आणि त्या गरजूंची थोडीफार तरी भुक भागेल असे कार्य हाती घेऊन करत राहुया. यावेळी भूगोल फाउंडेशन व संतनगर मित्र मंडळाचे सदस्य कर्नल तानाजी अरबुज, अनिल जगताप, साहेबराव गावडे, शशिकांत वाडते, राजेंद्र ठाकूर, सुनील बांगर,सुनील काटकर, विशाल शेवाळे,मनोज माकोडे, मयूर इचके, अजिंक्य पोटे, अमोल सुपेकर , सचिन घेनंद, तसेच महिला सदस्या सौ शिला इचके, ज्योति दरंदले, कु.अपूर्वा वाळुंज, कु. वैदेही चव्हाण, कु. यश सिंग या उपक्रमात सहभागी झाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *