डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला नेहमीच प्रेरणादायी – युगप्रवर्तक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष गौतमराव खरात

आंबेगाव : – (ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी , आंबेगाव )
      आज घोडेगाव ता आंबेगाव येथे युगप्रवर्तक प्रतिष्ठाण आयोजित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोहत्सव समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ जयंती च्या नियोजन बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते प्रमुख पहाणे म्हणून बोलत होते
  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते गौतमराव रोकडे होते
        यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती चे आयोजन करणेसाठी व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या  या वर्षीच्या जयंती मोहत्सव समितीच्या अध्यक्षपदी नवयुवक अमित रोकडे तर कार्याध्यक्ष पदी नवीन सोनवणे कोषाध्यक्ष पदी संतोष देठे तर उपाध्यक्ष पदी प्रदीप साळवे व नवीन अभंग आणि खजिनदार पदी शंकर  सोनवणे यांची निवड करण्यात येऊन प्रमुख मान्यवरच्या हस्ते फेटा,शाल,गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी युगप्रवर्तक प्रतिष्ठाण आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोहत्सव समितीने राबविलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली
या मध्ये दरवर्षीप्रमाणे पुणे जिल्ह्यात खुल्या गटासाठी महानायक चषक या नावाने स्पर्धा आयोजित केली असून पुणे जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात प्रभावी कार्य करणारे जुन्नर  तालुक्यातील मांजरवाडी प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक याना डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यारत्न पुरस्कार जाहीर झाला असून आंबेगाव तालुक्यातील भूमीपुत्रांनी  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना आंबेगाव भूषण या पुरस्काराने  राज्याचे कामगार व उत्पादनशुल्क मंत्री मा ना दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या हस्ते  डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी प्रदान करण्यात येणार आहे
सन २०२०-२१ या वर्षीचा आंबेगाव भूषण पुरस्कार हा सामाजिक क्षेत्र रामदास जाधव -धामणी ,राजू घोडे बोरघर, आनंद साळवे कळंब २)प्रशासकीय सेवा -श्रीप्रकाश वाघमारे मुंबई पोलीस उपायुक,घोडेगाव३)उदयोग क्षेत्र मा गणेश भाऊ कोकणे सुपेधर ४)शिक्षण क्षेत्र- प्राथमिक विभाग अरविंद मोढवे ,माध्यमिक विभाग ,श्री लाजरास उपार तर वरिष्ठ विभाग प्रा डॉ इंद्रजित जाधव सर ५) कृषी क्षेत्र-श्री कांताराम लोहकरे निगडाळे ६)  क्रीडा क्षेत्र,- श्री संदीप चव्हाण सर तर खो खो खेळाडू कु काजल भोर ७) पत्रकारिता  दैनिक सकाळचे श्री चंद्रकांत घोडेकर तर इलेक्ट्रिक मीडिया आपला आवाज न्युज नेटवर्कचे  -मोसीन काठेवाडी -८) वैद्यकीय क्षेत्र -डॉ सुहास कहडणे ९)कायदे विषयक- सौ  काजळे मॅडम१०) आदर्श निवेदक – श्री निलेश पडवळ पोंदेवाडी ११) कला क्षेत्र -श्री कैलास करंडे  १२) आदर्श सरपंच, श्री विठ्ठल ढोबळे  १३) कोरोना योद्धा श्री शंकर केदारी ससून  हॉस्पिटल पुणे याना सन्मानित करण्यात येणार असून
     तर कोरोना काळात आरोग्य विभाग,महसूल विभाग,पोलीस खाते,वनविभाग, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना याना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तर युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे आधारस्तंभ  ज्याचे कोरोना काळात  निधन झाले त्यांना मरणोत्तर समाजरत्न पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त करण्यात येणार आहे
         कोरोना काळात महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार कार्यक्रमात बदल केला जाईल सर्व नियमांचे पालन करून जयंती मोहत्सव साजरा करण्यात येणार आहे
        या वेळी गौतमराव रोकडे, नवनिर्वाचित अध्यक्ष अमित रोकडे ,कोषाध्यक्ष संतोष जाधव  उपाध्याय प्रदीप  साळवे, नवीन अभंग  बशीर इनामदार यांनी मनोगत व्यक्त केली
   या प्रसंगी माधव खरात, दयानंद मोरे, सचिन अभंग,एकनाथ शिंदे नितीन खरात,अमोल अंकुश, किशोर वाघमारे ,पत्रकार मोसीन काठेवाडी  आदी मान्यवर उपस्थित होते
प्रास्ताविक नवनिर्वाचित अध्यक्ष अमित रोकडे यांनी केले सूत्रसंचालन नितीन खरात यांनी तर आभार  संतोश देठे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *