नांदेड निवडणूकीतील विजयाचा पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कडून जल्लोष

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०२ नोव्हेंबर २०२१

पिंपरी


आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मतरदासंघातील पोटनिवडणूकीमध्ये काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. जितेश रावसाहेब अंतापुरकर सुमारे ४१००० मतांनी विजयी झाले याबाबत शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पिपंरी चौकात फटाके वाजवून, पेढे वाटून व घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. तसेच राजस्थान,कर्नाटक,हिमाचल इतर सर्वच व महाराष्ट्रातील पोटनिवडणूकीतील विजया बाबत शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. या वेळी सोनिया गांधी झिंदाबाद ! राहूल गांधी झिंदाबाद ! प्रियांका गांधी झिंदाबाद! महाविकास आघाडी झिंदाबाद ! नाना पटोले झिंदाबाद ! अशोक चव्हाण झिंदाबाद ! अशा घोषणा देत जल्लोष केला.

नांदेड निवडणूकीतील विजयाचा पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कडून जल्लोष

या वेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले, “हा विजय सोनिया गांधी, राहूल गांधी, शरद पवार साहेब व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहंबाचा, नानाभाऊ पटोले व अशोक चव्हाण साहेबांचा तसेच नांदेड मधील सामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे, हा विजय देशातील भाजपाच्या अन्यायकारक धोरणे, जीवनावश्यक वस्तूंची महागाई, पेट्रोल झिझेल ची भरमसाठ दरवाढ, शेतकरी कामगार विरोधी कायदे यांच्या विरोधात जनतेने दिलेले उत्तर आहे व स्व. रावसाहेब अंतापूरकरांना मतदारांनी वाहिलेली श्रध्दाजंली आहे.” या प्रसंगी काँग्रेस चे शहराध्यक्ष कैलास कदम, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम आगरवाल, माजी नगरसेवक सदगुरू कदम, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष ॲड उमेश खंदारे, अजिंक्य बारणे, माऊली मलशेट्टी, के एम रॅाय, के हरीनारायणन, इस्माईल संगम, आबा खराडे, किरण नढे, उमेश बनसोडे, वामन ऐनिले, सचिन कदम, दत्ता पवार, मिलिंद बनसोडे आदि उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *