भानुदास हिवराळे
बातमी प्रतिनिधी
२६ डिसेंबर २०२२
आळंदी
चला जाणूया नदीला या अभियाना अंतर्गत आळंदी जनहित फाउंडेशन, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, नेचर फाऊंडेशन, एल्गार सेना, यशवंत संघर्ष सेना, दक्षता सेवा फाऊंडेशन सह विविध सेवाभावी पदाधिकारी यांनी नदी साक्षर करण्यासाठी जनजागृती, नदी किनारा स्वच्छता तसेच इंद्रायणी नदी प्लास्टिक मुक्त करण्याचा उपक्रम राबवित परिसरातील प्लास्टिक कचरा उत्साहात संकलन करीत स्वच्छता अभियान राबविले. आळंदी येथील इंद्रायणी नदी परिसरात जाऊन नद्यांचे पात्रात तसेच किनाऱ्यावर पडलेले प्लास्टिक, प्लास्टिक कप,प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक कागद, कपडे संकलन करण्यात आले. या उपक्रमात आळंदी स्वच्छता अभियानचे मुख्य समन्वयक अर्जुन मेदनकर, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश रहाणे, यशवंत संघर्ष सेनेचे अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे,आळंदी शहर एल्गार सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब कवळासे, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, दक्षता सेवा फाउंडेशनचे आळंदी अध्यक्ष किरण नरके, शहादेव गोरे, सुरेश चाकणकर, लिंबाजी ढाके, ओंकार वैद्य महाराज, योगेश बोडखे, बाळासाहेब वायकुळे, बाळासाहेब खांडेकर, सिद्धेश्वर सलगर, विष्णू फरकानडे, प्रकाश बनकर, सांताराम बोबडे, आदीसह स्थानिक नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत इंद्रायणी नदीतील प्लास्टिक कचरा संकलन केले.
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, आरोग्य विभाग प्रमुख शितल जाधव यांचे मार्गदर्शनात आळंदी स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ सुरु करण्यात आले आहे. आळंदी तीर्थक्षेत्र स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्याचे उपक्रमात सर्व नागरिक, भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी केले आहे. औद्योगिकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढत आहे. शिवाय नद्या, जलाशयांमध्ये आलेल्या मैला मिश्रित, रसायन मिश्रित सांडपाणी गाळामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याची वहन क्षमता आणि साठवणूक क्षमता देखील कमी झाली आहे. यासाठी शासनाने नदीचे खोलीकरण, रुंदीकरण तसेच गाळ उपसा करून वाहत्या नदीसाठी अडथळे दूर करून इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याची गरज भाविक, नागरिकांतून चला जाणूया नदीला या उपक्रमात भावना व्यक्त झाली.
आळंदी येथील इंद्रायणी नाडीसह परिसरातील ओढे, नाले पुर्वरुप वाहते कसे राहतील यासाठी यापुढील काळात प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी नागरिकांनी, भाविकांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवून इंद्रायणी नदीत कचरा, सांडपाणी जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. नदीचे स्वास्थ, मानवी आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. प्रत्येकाने आपापल्या भागातील नद्या जिवंत व प्रवाही राहाव्यात यासाठी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश रहाणे यांनी केले आहे. चला जाणूया नदीला या अभियानच्या यशस्वितेसाठी सर्व शासकीय विभाग आणि विविध सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. राज्यातील नद्याचे जल प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती आणि नद्यांचे किनारा स्वच्छता अभियान मध्ये आळंदीत उपक्रम राबविण्यात आला. नद्यांत सांडपाण्याने प्रदूषण होऊ नये यासाठी उपाय योजनेसाठी परिसरात घोषणा देत जनजागृती करण्यात आली.