लखीमपूर येथील शेतकऱ्यांना चिरडून मारले त्या विरोधात केंद्र सरकार विरोधात आंबेगाव मध्ये महाघाडीकडून आंदोलन

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
११ ऑक्टोबर २०२१

आंबेगाव

उत्तर प्रदेश मधील लखिपुर खेरी येथे शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करून दोषीवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्याबाबत आज आंबेगाव तहसिल कार्यालया बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,शिवसेना असे महा विकास आघाडीचे पदाधिकारी , तसेच अखिल भारतीय किसान सभाचे कार्यकर्ते एकत्र येत या घटनेचा जाहिर निषेध,आंबेगाव तालुक्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी निवेदन देण्यात आले. घोडेगाव शहरात अनेक व्यापारी वर्गाने महाराष्ट्र बंद ला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली तर काही दुकाने चालु होती. तसेच अनेकांनी सोशल मिडिया द्वारे घटनेचा संताप व्यक्त करत , निषेध नोंदवला .

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक आप्पा काळे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मिलिंद काळे,घोडेगावचे सरपंच क्रांती गाढवे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष किरणशेठ घोडेकर ,जेष्ठ नेते सखाराम काळे, किसान सभेचे राजु घोडे ,कांताराम काळे , बाळासाहेब काळे, सुरेशशेठ काळे, ज्योतिताई घोडेकर, माधवीताई कर्पे तसेच एस एफ आय विद्यार्थी संघटनेचे अविनाश गवारी , आदी सह शेतकरी नागरीक उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *