चालक बेशुद्ध झाल्याने बसला अपघात

चिंचवड : दळवीनगर, चिंचवड येथे आज दुपारी तीनच्या सुमारास चालक बेशुद्ध झाल्यामुळे अनियंत्रित झालेली पीएमपीएमएलची एक बस दुभाजकावर चढली. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने एकाही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही.

मिळलेल्या माहितीनुसार, चालक बस चालवत असतानाच बेशुद्ध पडला, त्यामुळे बस अनियंत्रित होऊन दुभाजकावर चढली. यामुळे दुभाजकाचे दगड उखडले. छोटी-मोठी झाडे उन्मळून पडली. रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. काही वेळाने वाहतूक पोलिस घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या सहाय्याने बस दुभाजकातून बाहेर काढण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *