महापालिकेत समावेश झाला अन् पशुवैद्यकीय दवाखाने बंद

०४ नोव्हेंबर २०२२

चिखली


चिखली परिसरातील गावाचा महापालिकेत समावेश झाल्यापासून परिसरातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने बंद झाले व पशुपालकांना स्वखर्चाने खासगी डॉक्टरांकडून उपचार केल्याशिवाय पर्याय उरला नाही. चिखली व तळवडे परिसरातील पशूंची संख्या लक्षात घेता किमान एक तरी पशुवैद्यकीय केंद्र व हमीभाव मिळण्यासाठी शासकीय दूध संकलन केंद्र या ठिकाणी असणे आवश्यक असल्याची मागणी या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शेती क्षेत्रामध्ये घट होत गेल्याने लागणाऱ्या खुराकासोबत हिरवा चारादेखील विकतच घ्यावा लागतो. कारण परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे व दूषित पाण्यामुळे चाऱ्याचे उत्पन्न घेणेसुद्धा परवडत नाही , मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खुराकाच्या किमतीमध्ये जवळपास तीस टक्क्यांनी वाढ झाली , परंतु दुधाच्या भावात तेवढी वाढ नसल्याने आहे , त्या परिस्थितीत पशुधन जोपासण्याची कसरत ही मंडळी करीत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *