पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन एण्ड एंटरप्राईज(SPPU’s CIIE) यांच्यात सामंजस्य करार

पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरच्या बोधचिन्ह अनावरण

रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड -दि १५ डिसेंम्बर
पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अण्ड एंटरप्राईज (SPPU’s CIIE) यांचेमध्ये सामंजस्य करार (Memorandum of Understanding) मंगळवार, दिनांक १५/१२/२०२० रोजी सायंकाळी ४.३० वाजता पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर,ऑटोक्लस्टर डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, चिंचवड येथे पार पडला. प्रसंगी, पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष (अण्णा) लोंढे, संचालक सचिन चिखले, आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त प्रविण तुपे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरु डॉ. नितिन करमरकर, उपकुलगुरु उमराणी सर, रजिस्टार प्रफुल्ल पवार, एक्झीबीशन सेंटर प्रमुख अपुर्वा पालकर, सिनेट सदस्य संतोष ढोरे आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत राज्य स्तरीय उच्चाधिकार समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अभियान राबविणेकरीता केंद्र शासनाने मान्यता दिलेली असून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.ची स्थापना दि.१३ जुलै २०१७ रोजी करणेत आलेली आहे. केंद्र शासनाकडे सादर केलेल्या स्मार्ट सिटी प्रपोजलची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मार्फत हाती घेणेत आलेली असून स्मार्ट सिटीचे पॅन सिटी कामकाजाअंतर्गत महापालिका क्षेत्रात Start-Up Incubation Centre प्रकल्प हाती घेणेत आलेला आहे. यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. च्या संचालक मंडळाने ठराव क्रमांक १२४(८)/१९-२०, दिनांक १९/०७/२०१९ अन्वये मान्यता दिलेली असून यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांना दिलेले आहेत.या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विशेष उद्देश वहन (SPV) स्थापन करण्यात येईल. या विशेष उद्देश वहन समिती (SPV) च्या संचालक मंडळामध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., ऑटो क्लस्टर व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांचे अधिकारी, पदाधिकारी यांचा समावेश असेल. या प्रकल्पाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., ऑटो क्लस्टर रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांचेमध्ये दि. १७ सप्टेंबर २०१९ रोजी सामंजस्य करार (MoU)करण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक २५ डिसेंबर २०१९ रोजी “पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर” या SPV ची स्थापना करण्यात आली आहे.

या प्रकल्पांतर्गत Incubation Centre हे नव्याने उद्योग/व्यवसायिक स्थापन करणेसाठी आवश्यक ते सहकार्य, मार्गदर्शन व जागा Incubation Centre मार्फत नवोदित उद्योजकांना पुरविण्यात येतील व ज्यामुळे शहराच्या परिसरातील उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी. लि. मार्फत सदरचे Incubation Centre निर्माण करणेसाठी निधी पुरविणार असुन स्मार्ट सिटी प्रपोजलमध्ये सदरचा प्रकल्पासाठी रक्कम रुपये पाच कोटी इतकी तरतुद करण्यात आलेली आहे. त्यामधुन आवश्यकतेनुसार निधी पुरविण्यात येत आहे.
ऑटो क्लस्टर रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट मार्फत प्रकल्पासाठी आवश्यक असणा-या सर्व पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स हे नवोदित उद्योजक यांना मार्गदर्शन तसेच व्यवस्थापन यासाठी जबाबदार आहेत. सदर प्रकल्पासाठी स्थापन करणेत येणा-या विशेष उद्देश वहन (SPV) चे अध्यक्ष हे मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. हे आहेत. सदरचे विशेष उद्देश वहनास (SPV) त्रयस्थ संस्थेमार्फत सहाय्य केले जाईल. ही त्रयस्थ संस्था विविध सेवा म्हणजेच कार्यक्रमांचे आयोजन, कार्यपध्दती, कौशल्य विकास व क्षमता बांधणी इत्यादीची आखणी करणेकामी सेवा पुरवली जात आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., ऑटो क्लस्टर व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांनी संयुक्तपणे नवोदित तयार होणारे उद्योजक यांना प्रशिक्षण, शासकीय योजनांची माहिती, उत्पादन तयार करणेकामी चाचणी व गुणवत्ता इत्यादीबाबत सुविधा उपलब्ध करणे व याकामी आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करणेकामी नियोजन करत आहेत.

सद्य:स्थितीत ऑटो क्लस्टर येथे पहिल्या मजल्यावर या प्रकल्पासाठी ३०००चौरस फुट. जागा तसेच २४ Incubation Start-up ची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. सद्य:स्थितीमध्ये १२ Incubation Start-up ची नेमणूक करण्यात आलेली असून भविष्यकाळात त्यांची छाननी होऊन पुढील मदत देण्याचे प्रस्तावित आहे.

उपरोक्तनुसार पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., ऑटो क्लस्टर आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.१४ नोव्हेंबर २०१९ रोजी Incubation Centre चे उद्घाटन समारंभ तत्कालीन मा.महापौर राहुल जाधव, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तथा माजी संचालक, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., तसेच ऑटोक्लस्टर डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च इन्स्टिटयूट यांचे संयुक्त विद्यमाने दि.२८/०२/२०२० व दि.२९/०२/२०२० रोजी फेस्टीवल ऑफ फ्युचर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये जागतिक स्तरावरील तज्ज्ञ व्यक्तींनी उदयोन्मुक उद्योजकांना मार्गदर्शन केले. फेस्टीवल ऑफ फ्युचर या इव्हेंटमध्ये Pitch fest , Hackathon, Conference, Innovation Expo इत्यादी विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते. Pitch fest मध्ये विविध उद्योजकांनी उदयोन्मुख व्यावसायिकांना उदयोगधंद्यासाठी लागणा-या अर्थिक सहाय्याकामी तसेच उद्योग सुरु करण्यासाठी लागणारे मार्गदर्शन केले. Hackathon अंतर्गत विविध गटांना त्यांना सुरु करावयाच्या उद्योगाचे आराखडा, अर्थिक नियोजन, त्यात येणारे अडथळे व त्यावरील उपाय इत्यादींबाबत स्पर्धा घेण्यात येउन Incubatee निवडण्यात आले. Innovation Expo द्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व परिसरातील उदयोन्मुख Incubatee यांनी त्यांनी सुरु केलेल्या प्रकल्पांना प्रदर्शित करण्याचा मार्ग दिला व त्यांचे प्रॉडक्ट, उपक्रम, प्रकल्पांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले. फेस्टीवल ऑफ फ्युचर मधुन इन्क्युबीटीजची निवड करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रम होण्याआधी पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरमध्ये १२ Incubatee कार्यरत होते. तथापि, मार्च २०२० मध्ये सुरु झालेल्या COVID19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सध्या येथे ६ Incubatee कार्यरत आहेत. COVID19 चे वातावरणामुळे मार्च २०२० पासून ते आजअखेर सर्व Incubatee यांना ऑनलाईन सेवा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांचेमार्फत पुरविणेत येत आहे. लवकरच फेस्टीवल ऑफ फ्युचर मधुन निवड करण्यात आलेल्या इन्क्युबीटीज येथे काम सुरु करतील. पिंपरी चिंचवड शहर व परिसरात दरवर्षी हजारो युवक व युवती पदवी मिळाल्यानंतर नोकरीच्या शोधात असतात अथवा स्वत:चा उद्योगधंदा सुरु करतात. जे युवक युवती स्वत:चा उद्योग सुरु करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. बरेचवेळा त्यांना अर्थिक व तांत्रिक अडचणी येत असतात. अशा वेळेस स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर त्यांना मार्गदर्शक ठरते. तथापि, त्यांना त्यासाठी समुपदेशन, योग्य दिशा दाखविणे आवश्यक असते. यासाठीच या पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन एण्ड एंटरप्राईज(SPPU’s CIIE) यांचेमध्ये सामंजस्य करार (Memorandum of Understanding) करण्यात येत असून त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जास्तीत जास्त Startup सुरु होऊन अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पिंपरी चिंचवड परिसरात जास्तीत जास्त युवक युवतींना लाभ होऊन त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळुन स्वत:चे उद्योग सुरु करतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन एण्ड एंटरप्राईज(SPPU’s CIIE) हे नवीन उदयान्मुख उद्योजकांचा शोध घेणे, त्यांचेसाठी धोरणे आखणे, त्यांना समुपदेशन करणे, तांत्रिक सहाय्य करणे, आवश्यक प्रशिक्षण देणे, गुंतवणुकदांशी संपर्क साधण्यासाठी सहाय्य करणे, नवीन उदयान्मुख उद्योजकांना प्रसिध्दी देणे इत्यादी सहाय्य करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *