फ्लॅटचे खरेदीखत करूनही ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
११ ऑक्टोबर २०२१

नारायणगाव

फ्लॅटचे खरेदीखत करून पूर्ण रक्कम घेऊन देखील एका महिलेला फ्लॅटचा ताबा न देणाऱ्या गणराज इंटरप्रायजेसच्या भागीदार असणाऱ्या ४ जणांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.उमेश नामदेव इचके (रा.नागापुर ता.आंबेगाव जि.पुणे),भाउसाहेब बंडु पाटिल (रा.गिरवली, ता.आंबेगाव), संतोष दत्तात्रय वाघ (रा.रांजणी ता.आंबेगाव ) विशाखा संजय जाधव (रा.जाधववाडी ता.आंबेगाव) यांच्यावर नारायणगाव पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३४,४२० नुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे . याबाबतची फिर्याद पुनम राहुल माचरेकर (रा.थोरांदळे ता.आंबेगाव) यांनी दिली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार २२ जून २०१८ ला पूनम माचरेकर यांनी उमेश नामदेव इचके यांच्या ओळखी मधून गणराज इंटरप्रायजेसचे भागीदार भाऊसाहेब पाटिल , संतोष वाघ , विशाखा जाधव यांच्या नारायणगाव येथील ओमसाई अपार्टंमेंट मधील फ्लॅट नं.१२ च्या क्षेत्र ६१५ चौ.फुट चे खरेदी खत नारायणगाव दुय्यम निबंधक कार्यालयात करून त्यामोबदल्यात १६ लाखांची रक्कम देऊन देखील माचरेकर यांना ओमसाई अपार्टंमेंटमधील फ्लॅट नं. १२ चा ताबा दिला नाही. अथवा व्यवहारापोटी दिलेली रक्कम देखील परत दिलेली नाही. याउलट भाउसाहेब बंडू पाटिल यांनी माचरेकर यांना आपल्यात झालेल्या ओमसाई अपार्टंमेंट मधील फ्लॅट नं.१२ ऐवजी फ्लॅट नं ८ च्या व्यवहाराचा संपुर्ण मोबदला मी तुम्हाला परत करील असे स्टँम्प पेपरवर लिहुन दिले. यात भाउसाहेब पाटिल यांनी जाणीवपुर्वक फ्लॅट नं.१२ ऐवजी फ्लॅट नं ८ असे स्टँम्प पेपरवर लिहुन दिले होते .

मात्र हे पाटील याने लबाडीने फ्लॅट नं.१२ ऐवजी फ्लॅट नं ८ असा चुकीचा उल्लेख केला आहे. असे निदर्शनास आणून दिले असताना देखील आजतागायत काहीच रक्कम परत दिलेली नाही. त्यानंतर भाउसाहेब पाटिल यांची भेट घेवुन त्यांच्याकडे सदर स्टॅम्पमधील मजकुरा मध्ये फ्लॅट नं.१२ ऐवजी फ्लॅट नं ८ असा उल्लेख झाला आहे . त्याची दुरूस्ती करून मागितली असता भाउसाहेब पाटिल व त्याचा सोबत असलेल्या इसमांनी पूनम माचरेकर त्यांचा भाऊ आकाश आणि आई जयश्री यांना बेदम मारहाण केली होती. त्याप्रकरणी भाउसाहेब बंडु पाटिल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे पूनम माचरेकर यांची फसवणुक करण्याच्या उद्देशाने फ्लॅटचे खरेदीखत करून पूर्ण रक्कम घेऊन देखील फ्लॅटचा ताबा न देता स्टम्पपेपरवर फ्लॅट नं.१२ ऐवजी फ्लॅट नं. ८ चे असे नमुद करून आज पर्यंत फ्लॅट नं.१२ चा ताबा दिला नाही अगर फ्लॅट खरेदीच्या व्यवहारापोटी घेतलेली १६ लाखांची रक्कम परत न करता आर्थिक फसवणुक केली आहे. या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *