भोर लॉकअप तोडून फरार झालेल्या मोक्का मधील कुख्यात दरोडेखोरास सिनेस्टाईल पाठलाग करून केले जेरबंद: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी…

(बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर)

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यांसारखे 14 गंभीर गुन्हे असलेला आरोपी, नामे चंद्रकांत लोखंडे वय 32 रा. ढवळ, ता. फलटण. जि. सातारा याने पुणे, सातारा, नवी मुंबई जिल्ह्यात अनेक मोठे गुन्हे करून दहशत पसरवली होती. राजगड पोलीस स्टेशन हद्दीत कापूरहोळ या गावात पोलिसांचा वेष परिधान करून, बालाजी ज्वेलर्स सोनार दुकानावर आपल्या साथीदारांसोबत दरोडा टाकून मोठ्या प्रमाणात सोने चांदी लुटून नेले होते. सदर गुन्हेगाराची वाढती दहशत तसेच गुन्ह्याचे प्रकार थांबवून, त्यास त्वरित अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.
त्यानुसार सदर गुन्ह्यांचा तपास करीत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, वरील आरोपी नामे चंद्रकांत लोखंडे हा नीरा. ता पुरंदर या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला व त्यात तो आरोपी अलगद अडकला. या आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करण्याकामी राजगड पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
दि.17 फेब्रुवारी 2020 रोजी भोर लॉकअप या ठिकाणी पोलीस कस्टडीत असताना, लॉकअपचा गज कापून पहाटे 5/6 च्या दरम्यान आरोपी चंद्रकांत लोखंडे व प्रवीण राऊत हे दोन्ही आरोपी लॉकअप मधून पळून गेलेले होते.
सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने, पळून गेलेल्या आरोपीस ताबडतोब अटक करण्याच्या सूचना मा. पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर आरोपीचा तपास करण्याचे मोठे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेपुढे होते.

 सविस्तर बातमी अशी की, दि.15/04/2021  रोजी बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली की, चंद्रकांत लोखंडे हा मुंबई वरून कर्नाटक याठिकाणी ट्रॅव्हल्स मधून निघाला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने रवाना झाले. पथकाने मुंबई एक्सप्रेस ला सदर बसचा पाठलाग सुरू केला. चांदणी चौक पास करून सदर बस खेडशिवापुर च्या दिशेने पुढे निघाली. बसचा सिनेस्टाईल पाठलाग करून, खेडशिवापुर या ठिकाणी बस आल्यावर बस ताब्यात घेऊन झडती घेतली असता, चंद्रकांत लोखंडे बस मध्ये आढळून आला. त्याची झडती घेऊन त्यास ताब्यात घेतले असून, त्याची वैदकीय तपासणी करून पुढील तपासासाठी भोर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपीवर 

शिरवळ पो स्टे गु. र. न. – 77/2017 भादवी कलम 393, 34
वडगाव नि. पो स्टे 166/2017 भादवी कलम 393, 34
लोणंद पो स्टे 266/2017
भादवी कलम 399, 402
लोणंद पो स्टे 267/2017 भादवी कलम 457, 380, 34
लोणंद पो स्टे 269/2017 भादवी कलम 399, 34
लोणंद पो स्टे 385/2020
भादवी कलम 393, 34
लोणंद पो स्टे 418/2020
भादवी कलम 392, 34
जेजुरी पो स्टे 256/2020 भादवी कलम 454, 457, 380
जेजुरी पो स्टे 323/2020 भादवी कलम 454, 457, 380
राजगड पो स्टे 509/2020
भादवी कलम 395, 397, 307
आर्म ऍक्ट 3,25
बारामती तालुका पो स्टे 601/2017 भादवी कलम 392, 34 असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अशा अट्टल गुन्हेगाराला पकडल्याने, पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीबाबत सर्वत्रच समाधान व्यक्त केले जात असून, कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सदरची कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटिल, भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिणचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, पो उपनिरीक्षक अमोल गोरे, पो उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पो ह शिंदे, पो. ना मोमीन, पो शी शेडगे, पो शी भगत, पो शी खडके, पो शी नवले, पो शी घाडगे, सहा फौ. जगताप, सहा फौ पठाण, पो ह निश्चित, पो ह तांबे, चालक पो ह राजापुरे, पो ह कदम, पो शी जावळे व नाईकनवरे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *